Pune Crime: खळबळजनक! शिरूरमध्ये एका अज्ञात व्यक्तीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

ही घटना शिरूर (Shirur) तालुक्यातील सणसवाडी येथे घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

Image used for representational purpose

पुण्यात (Pune) एका अज्ञात व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना शिरूर (Shirur) तालुक्यातील सणसवाडी येथे घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. या घटनेत संबंधित मृत व्यक्तीचा चेहरा अत्यंत वाईट पद्धतीने ठेचला होता. त्यामुळे मृत व्यक्ती नेमकी कोण आहे? याबाबत गावात चर्चा सुरू होती. या घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. तसेच पोलिसांनी मृत व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोचिंग मांझी असे मृत व्यक्तीचे नाव असल्याचे सांगितले जात आहे. लोचिंग हा मुळचा बिहारचा असून सध्या शिरूर तालुक्यातील डिग्रजवाडी याठिकाणी राहत होता. मात्र, अज्ञात व्यक्तीने शिरूर तालुक्यातील सणसवाडीतील साठे वस्ती जवळील चासकमान कालव्याच्या रस्त्यावर अज्ञात व्यक्तीने त्याची हत्या केली आहे. या घटेनत लोचिंगचा चेहरा अत्यंत वाईट पद्धतीने ठेचण्यात आला आहे. ज्यामुळे त्याची ओळख पटवणे अवघड झाली होती. शिक्रापूर पोलिसांनी तपासाची चक्र गतीने फिरवल्याने मृत व्यक्तीचे नाव लोचिंग मांझी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हे देखील वाचा- Nagpur: कोविड सेंटरमधील धक्कादायक प्रकार; महिला डॉक्टरवर बलात्काराचा प्रयत्न, आरोपीला अटक

यापूर्वी मंगळवारी पुण्यातील दौंड परिसरात अशीच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रेमात अडथळा ठरणाऱ्या एका महिलेची तिच्या पतीने हत्या केली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी पतीसह त्याच्या प्रेयसीला अटक केली आहे. तसेच त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती होताच यवत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.