मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील पाच धरणांमधील अतिरिक्त पाणी सोडले

त्यामुळे धरण आणि नद्यांमधील पाणी काठोकाठ भरले असून तेथे राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

धरण (Photo Credit: Youtube)

महाराष्ट्रातील (Maharashtra) विविध राज्यात गेल्या काही दिवसांपासून हजेरी लावल्याने मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे धरण आणि नद्यांमधील पाणी काठोकाठ भरले असून तेथे राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील पाच धरणांत अतिरिक्त पाणी साठल्याने तो सोडून देण्यात आले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

तसेच गोदीवरी आणि मुठा नदीच्या तठावरील असलेल्या नागरिकांना धरणातील पाणी यामध्ये सोडण्यात येणार असल्याने पाण्याची पातळी वाढू शकल्याना अंदाज व्यक्त करत सतर्कतेचा इशारा दिला आहे. धरणांमधून सोडण्यात आलेले अतिरिक्त पाणी दक्षिण मध्य आणि मराठवाड्यांचा काही भागांना पुरवले जाणार आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील जळगाव आणि गांडगापूर येथील धरणातील अतिरिक्त पाणी तापी आणि गोदावरी नदीत सोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.(Maharashtra Monsoon 2019: गोदावरी नदीने ओलांडली धोक्याची पातळी, तर कोल्हापूरातील गगनबावडा-कोल्हापूर मार्ग वाहतूकीसाठी बंद)

तसेच गांडगापूर येथील धरणातील पाणी औरंगाबाद येथील जायकवाडी धरणात सोडण्यात येणार असून त्याचा फायदा मराठवाड्याला होणार आहे. वीर आणि खडकवासला धरणातील अतिरिक्त पाणी नीरा आणि मुठा नदीत सोडल्यास ते उज्जयन धरणाला मिळू शकते.उज्जयन धरणातील पाण्याचासाठा 117 टीएमसी पर्यंत राहू शकते. त्यामुळे या धरणातील पाण्याचा वापर संपूर्ण सोलापूरला केला जातो. मात्र अद्याप सोलापूरात पुरेसा पाऊस झाला नसल्याचे ही सांगण्यात आले आहेत. तर नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे दुतोंड्या मारुतीचा पुतळा पाण्याखाली गेला असल्याचे स्थिती निर्माण झाली आहे.