मध्य प्रदेशातील 'ऑपरेशन लोटस'च्या अयशस्वी प्रयत्नानंतर अशोक चव्हाण यांचा BJP ला खोचक टोमणा, पहा काय म्हणाले

अशी खोचक टीपण्णी देखील केली आहे.

अशोक चव्हाण (Photo Credit: PTI)

मध्य प्रदेशमध्ये भाजपाने सत्ताधारी पक्षाच्या 8 आमदारांना एका हॉटेलमध्ये कोंडल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान यामध्ये 25-35 कोटींची ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर आल्याने सर्वत्र खळबळ पसरली होती. मात्र यामध्ये काँग्रेसचे जेष्ठ नेते दिग्विजय सिंह (Digvijaya Singh) यांनी भाजपचे ऑपरेशन लोटस फेल झाल्याचे माहिती प्रसारमाध्यमांना दिल्याने चर्चा थांबली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देखील काही वेळापूर्वी मीडियाला माहिती देताना कमलनाथ सक्षम मुख्यमंत्री असून 'ऑपरेशन लोटस' ला देशभरात खतपाणी घातलं जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असं म्हटलं आहे. दरम्यान भाजपाचं ऑपरेशन लोटस नसून कोरोना व्हायरस आहे त्यावर अँटीबायोटिक शोधण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. अशी खोचक टीपण्णी देखील केली आहे. भाजपचे ऑपरेशन लोटस अपयशी; कमलनाथ सरकारला कोणताही धोका नसल्याचे दिग्विजय सिंह यांची माहिती.  

दरम्यान 228 सदस्यसंख्या असलेल्या मध्य प्रदेश विधानसभेत काँग्रेसचे 114 आमदार आहेत. त्यांना दोन बसपा, एक सपा आणि चार अपक्षांसह 7 आमदारांचा पाठिंबा आहे. तर भाजपकडे 107 आमदारांचे बळ आहे. त्यामुळे आठ आमदारांना वळवल्यास भाजपला मध्य प्रदेशामध्ये पुन्हा सत्ता खेचून आणणे शक्य झाले असते मात्र त्यांचा हा प्रयत्न फसला आहे.

अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्रामध्ये शिवसेना, कॉंग्रेस आणि एनसीपीचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. मात्र सध्या मुस्लीम आरक्षण, भीमा कोरेगाव हिंसाचाराची NIA कडून तपासणी यावरून सरकारमधील मतभेद समोर येत आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी मुस्लीम आरक्षणासंदर्भात घेतलेली भूमिका योग्यच आहे. यापूर्वी शिवसेना-भाजपा युतीची विचारसरणी एकच होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चिंता करण्याची गरज नाही. जर मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारचा पाठिंबा काढला तर आम्ही या मुद्द्यासाठी सरकारला पाठिंबा देऊ असं मत भाजपाच्या सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं आहे.