Kalyan Firing: माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर पोलिस ठाण्यात गोळीबार, उल्हासनगरमध्ये खळबळ
उल्हासनगर येथे भाजप आमदाक गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला.
Kalyan Firing: उल्हासनगर येथे शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची धक्कदायक माहिती समोर येत आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी थेट पोलिस स्टेशनमध्ये महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. ही घटना उल्हासनगर पोलिस ठाण्यातील हिललाईन येथे घडली. या घटनेत महेश गायकवाड जखमी झाले असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा पोलिस तपास करत आहे. (हेही वाचा- बंद खोलीत दोन मृतदेह आढळून आल्याने पुण्यातील नऱ्हे परिसरात खळबळ
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून कल्याणमध्ये राजकीय वातावरणामुळे वाद सुरु आहे. दरम्यान शुक्रवारी २ फ्रेब्रुवारी एका वादातून उल्हासनगर हिललाईन पोलिस ठाण्यात चर्चा सुरु होती. वरिष्ठ पोलिस निरिक्षकाच्या केबिनमध्ये बैठक सुरु असताना, आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात वाद झाले. हा वाद इतका टोकाला गेला की, आमदार गणपक गायकवाड यांनी महेश गायकवाड याच्यावर वरिष्ठांसमोरच गोळीबार केला. या घटनेनंतर पोलिस ठाण्यात एकच खळबळ उडाली. पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी महेश यांना रुग्णालयात दाखल केले.
या घटनेत महेश यांना गंभीर जखमा झाल्या असल्याची माहिती मिळाली. त्यांच्या हाताला जखम झाल्याची माहिती आहे. उपचाराासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबाराची घटना परिसरात हव्यासारखी पसरली, त्यानंतर परिसरात नागरिकांनी गर्दी केली. या घटनेनंतर परिसरात नागरिकामध्ये घबराट निर्माण झाला आहे. दोघांमध्ये गेल्या अनेक दिवस जमिनीवरून वाद सुरु होते. , एका 50 गुंठे जमिनीचा वाद सुरू होता. मागील तीन दिवसांपासून हे प्रकरण सुरू होते, अशी माहिती पोलिस ठाण्यातून देण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.