Lockdown: स्थलांतरीत मजुरांसाठी पुणे विभागात एकूण 164 रिलीफ कॅम्पची उभारणी

लॉकडाऊनमुळे देशातील विविध राज्यातील मजूर शहरांमध्ये अडकले आहेत. या मजूरांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी राज्य सरकारने विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्थादेखील केली आहे. अशातच पुणे विभागात स्थलांतरीत मजुरांसाठी एकूण 164 रिलीफ कॅम्पची उभारणी करण्यात आली आहे.

Migrant Workers | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Lockdown: कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन (Lockdown) पाळण्यात येत आहे. लॉकडाऊनमुळे देशातील विविध राज्यातील मजूर शहरांमध्ये अडकले आहेत. या मजूरांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी राज्य सरकारने विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्थादेखील केली आहे. अशातच पुणे विभागात (Pune Division) स्थलांतरीत मजुरांसाठी (Migrant Workers) एकूण 164 रिलीफ कॅम्पची (Relief Camps) उभारणी करण्यात आली आहे.

स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी पुणे जिल्हा प्रशासनामार्फत 95 कॅम्प, कामगार विभागामार्फत 56 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 13 कॅम्प, असे पुणे विभागात एकूण 164 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये 10 हजार 876 स्थलांतरित मजूर असून 69 हजार 321 मजुरांना भोजन देण्यात येत आहे. (हेही वाचा - नागपूर: ग्रामीण भागातील दारूची दुकाने उघडल्यानंतर तळीरामांच्या दुकानांसमोर लांबच लांब रांगा)

पुण्यात गुरुवारी दिवसभरात 163 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. यात नायडू-महापालिका रुग्णालयात 134, खासगी रुग्णालयात 22 आणि ससून 07 रुग्ण आढळले. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 हजार 987 वर पोहोचली आहे. तर दिवसभरात 109 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत पुण्यात 1486 जणांनी कोरोनावर मात केली आहे.