Mumbai Pune Expressway: भयंकर! रस्त्याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या एका इंजिनीअरचा रोड रोलरखाली चिरडून दुर्देवी मृत्यू

या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

Representational Image | (Photo Credits: ANI)

रस्त्याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या एका 24 वर्षाय इंजिनीअरचा (Engineer) रोड रोलरखाली (Road Roller) चिरडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही घटना आज मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर (Mumbai Pune Expressway) घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, रोलरखाली अपघात झाल्याचे कळताच रोड रोलर चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. याप्रकरणी महामार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पसार झालेल्या रोड रोलर चालकाचा शोध घेतला जात आहे.

मनोज जगदाळे असे रोड रोलरखाली येऊन मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. जगदाळे हे नवीन मेरीको कंपनीत इंजिनीअर म्हणून कार्यरत होते. एक्स्प्रेस वेवर रासायनी गावाजवळ मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर महामार्ग देखभाल व दुरुस्तीचे काम सुरू आहे. जगदाळे हे आज या कामाची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी जगदाळे यांना रोलरची धडक बसली. ज्यामुळे जगदाळे यांचे डोके रोड रोलरच्या समोरील चाकाखाली चिरडले गेले. त्यामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झाला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र टाईम्स वृत्त दिले आहे. हे देखील वाचा- Accident: लग्नासाठी जात असताना रस्त्यातच गाडीचा टायर फुटला; दोघांचा मृत्यू, 6 जण जखमी

या अपघातामुळे जगदाळे यांच्या कुटुंबियांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. या अपघातानंतर जगदाळे यांचा मृतदेह जवळच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी अधिक चौकशीला सुरुवात केली आहे. तसेच पसार झालेल्या रोड रोलर चालकाचाही शोध घेतला जात आहेत.