ED Summons MLA Rohit Pawar: रोहित पवार यांना ईडीचे समन्स, 24 जानेवारीला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश

या समन्सनुसार येत्या 24 जानेवारी रोजी त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

Rohit Pawar | (Photo Credit - X)

अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि पक्षाचे सुप्रिमो शरद पवार यांचे नातू रोहित पवार समन्स ( ED Summons MLA Rohit Pawar) जारी केले आहे. या समन्सनुसार येत्या 24 जानेवारी रोजी त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. ही कारवाई मनी लाँड्रिंगशी संबंधित सुरु असलेल्या चौकशीचा भाग आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSCB) कथित घोटाळा प्रकरणात ईडी तपास करत आहे. दरम्यान, ईडीने यापूर्वी 5 जानेवारी रोजी रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या मालकीच्या बारामती अॅग्रो या कंपनीच्या तसेच संलग्न संस्थांवर छापे टाकले होते. याच कारवाईचा पुढचा भाग म्हणून हे नोटीस पाठविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. असे असले तरी या कारवाईचा राजकीय अर्थ काढला जात आहे. पक्ष फुटला तरीही शरद पवार, रोहित पवार हे आक्रमकच असल्याने आता केंद्रीय संस्थांद्वारे सत्ताधाऱ्यांनी कारवाईचे षडयंत्र रचल्याची भावना, पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.

आधी छापेमारी मग कारवाई

MSCB घोटाळ्यात फेडरल एजन्सीच्या छाननीने रोहित पवार (वय 38) आणि महाराष्ट्र विधानसभेतील कर्जत-जामखेड मतदारसंघातून पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे आमदार यांना चौकशीच्या कक्षेत आणले आहे. बारामती अॅग्रोचे मालक आणि सीईओ म्हणून रोहित पवार हे या चौकशीत महत्त्वाचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फूटीनंतर अजित पवार यांचा गट वेगळा झाला आहे. असे असले तरी रोहित पवार हे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत उभे असल्याचे पाहायला मिळते. अजित पवार यांच्या बंडानंतर जे काही मोजके लोक शरद पवार यांच्यासोबत आहेत. त्यांच्यात रोहित यांचा समावेश होतो. MSCB घोटाळ्याशी संबंधित आर्थिक अनियमितता किंवा मनी लाँड्रिंग घडल्याची कृती यासंबंधी घडलेल्या घटनांचा तपास करण्यासाठी इडीने बारामती, पुणे, औरंगाबाद यासह इतर अनेक ठिकाणी छापे टाकल्याची माहिती आहे. (हेही वाचा, MSC Bank Scam: आमदार रोहित पवार यांच्या Baramati Agro वर ED ची धाड; 6 कार्यालयात कारवाई)

राज्याच्या राजकारणात पडसाद

रोहित पवार हे महाराष्ट्रातील बारामतीच्या वलयांकीत पवार कुटुंबातून येतात. त्यांचे आजोबा शरद पवार देश पातळीवरील मातब्बर नेते आहेत. ज्यांनी केंद्र सरकारमध्ये विविध पदे आणि जबाबदाऱ्या स्वीकारल्या, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याशीही रोहित यांचा कौटुबीक संबंध येतो. त्यामुळे राज्याच्या राजकारणात ईडीची कारवाई मोठी उल्लेखनीय आणि तितकीकच चर्चेची ठरत आहे. या नोटीसला रोहित पवार कसे सामोरे जातात याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, रोहित पवार याच्यासोबतच शिवसेना (UBT) गटाचे युवा नेत्यासही ईडीने नुकतीच अटक केली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif