Cash-for-Votes Investigation: मुंबई, सूरत, अहमदाबादसह देशभरातील विविध ठिकाणी ED चे छापे; विधानसभा नवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कारवाई
अंमलबजावणी संचालनालयाने 125 कोटी रुपयांच्या कथित मनी लॉन्ड्रिंगसह, मतांसाठी रोख रकमेच्या संशयास्पद प्रकरणाची चौकशी करत, देशभरातील अनेक शहरांमध्ये छापे टाकले आहेत.
देशभर राबविलेल्या एका व्यापक कारवाईत, अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) गुरुवारी अहमदाबाद, सुरत, मालेगाव, नाशिक आणि मुंबईसह अनेक शहरांमध्ये व्यापक शोधमोहीम सुरू केली आहे. महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Elections 2024) च्या पार्श्वभूमीव केला जाणारा पैशांचा वापर (Cash-for-votes), मनी लॉन्डींग (Money Laundering) आणि तत्सम गैरव्यवहार टाळण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. या कारवाईचा भाग म्हणून ईडीने देशभरातील विविध ठिकाणी छापे टाकले आहेत. ज्याचा उद्देश मतदान-खरेदी पद्धतींशी संबंधित संशयास्पद आर्थिक अनियमितता उघड करणे हा आहे.
देशभरात 13 ठिकाणी कारवाई
वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, अंमलबजावणी संचलनालय सध्या अहमदाबादमधील 13 ठिकाणी, सुरतमधील तीन ठिकाणी, मालेगाव, नाशिकमधील दोन ठिकाणी आणि मुंबईतील पाच ठिकाणी छापे टाकत आहे. हे छापे संभाव्य पैशाच्या मार्गांचा शोध घेण्याच्या आणि मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी वापरल्या जाणार्या संभाव्य लाच शोधण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहेत. मतदारांना प्रभावित करण्याच्या उद्देशाने सुमारे 125 कोटी रुपयांची उधळपट्टी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बेकायदेशीर व्यवहारांचे पुरावे उघड करण्याचा या कारवाईचा प्रयत्न आहे, विशेषतः बेकायदेशीर निधी लपवण्यासाठी कथितपणे गैरवापर केलेल्या बँक खात्यांना लक्ष्य करणे, अशा तक्रारी आल्याने संस्थेने ही कारवाई सुरु केली आहे. (हेही वाचा, Maharashtra Assembly Elections 2024: आचारसंहितेच्या काळात तब्बल 500 कोटी रुपयांहून अधिक बेकायदा मालमत्ता जप्त; 6 हजार पथकांमार्फत होत आहे वाहनांची तपासणी)
पैशांची अफरातफर करण्यासाठी खात्यांचा गैरवापर केल्याचा संशय
अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेस दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील संशयितांवर आर्थिकदृष्ट्या वंचित व्यक्तींच्या बँक खात्यांचा गैरवापर करून निधीचे वाटप मनी लॉन्ड्रींग आणि अफरातफर केल्याचा आरोप आहे. ईडीला संशय आहे की, ही योजना अनेक खात्यांद्वारे पैशाचे मूळ अस्पष्ट करण्यासाठी तयार केली गेली होती, ज्यामुळे ती वैध असल्याचे दिसून येते. "या तपासाचा उद्देश बेकायदेशीर पैशाचा ओघ शोधणे आणि या बँक खात्यांच्या गैरवापराची व्याप्ती निश्चित करणे हा आहे", असे या कारवाईत सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले. लाचखोरी आणि मते खरेदी करण्याच्या पद्धतींशी संबंधित अनियमित व्यवहारांचे आरोप सिद्ध करण्यासाठी अधिक पुरावे आणि सामग्री गोळा करण्यासाठी ईडीची पथके सक्रीय असल्याची सूत्रांची माहिती आहे. (हेही वाचा, Gujarat Cyber Fraud: सायबर फसवणूक करणाऱ्यांना बँक खाती पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, चार जणांना अटक)
राज्यात विधानसभा निवडणुका सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आगोदरच तपासणी जोरदारपणे सुरु ठेवली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह इतरही अनेक राजकीय नेत्यांच्या हेलिकॉप्टर, बॅग्ज आणि वाहनांची तपासणी सुरु आहे. त्यावरुन राजकीय गदारोळ सुरु असतानाच आता ईडीही सक्रीय झाली असून, विविध ठिकाणी छापे टाकले जात आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)