Yes Bank Money Laundering Case: येस बँक मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ED कडून कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांना अटक; मुंबईच्या विशेष कोर्टाने सुनावली दहा दिवसांची कोठडी
येस बँक घोटाळ्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या डीएचएफएलचे प्रवर्तक कपिल वाधवन आणि त्याचा भाऊ धीरज यांनी दाखल केलेली अंतरिम जामीन याचिका, रविवारी विशेष कोर्टाने फेटाळून लावली
येस बँक (Yes Bank) घोटाळ्यामुळे चर्चेत आलेल्या वाधवान कुटुंबातील (Wadhawan Family) 23 जण कोरोना लॉक डाऊन (Lockdown) दरम्यान मुंबईहून महाबळेश्वरला गेले होते. त्यानंतर सीबीआयद्वारे (CBI) या प्रकरणाची चौकशी सुरु झाली होती. आता येस बँक प्रकरणात वाधवान बंधूंना ईडीने अटक केली आहे. गँगस्टर इक्बाल मिर्चीशी निगडीत असलेल्या मनी लॉन्ड्रिंगच्या आणखी एका प्रकरणात वाधवान बंधूंची ईडीमार्फत चौकशी सुरू आहे. आता कपिल वाधवान (Kapil Wadhawan) आणि धीरज वाधवान (Dheeraj Wadhawan) यांना मुंबईच्या विशेष कोर्टाने 10 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पीटीआय ट्वीट -
येस बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयकडून 26 एप्रिल रोजी, महाबळेश्वर येथून डीएचएफएलचे प्रवर्तक कपिल वाधवन आणि आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सचे प्रवर्तक धीरज वाधवन, यांना ताब्यात घेण्यात आले होते. आता मुंबईच्या विशेष कोर्टाने यांना 10 दिवसांची कोठडी सुनावली आहे. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरनुसार, वाधवान बंधूंसह येस बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर आणि इतर काही लोक लाचखोरी प्रकरणात आरोपी आहेत. सीबीआयने म्हटले होते की 7 मार्च रोजी हा गुन्हा दाखल झाल्यापासून हे दोन्ही आरोपी फरार झाले होते आणि दोन्ही आरोपींना एप्रिलमध्ये लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ताब्यात घेण्यात आले होते. दुसरीकडे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही वाधावान बंधूंच्या वाढत्या अडचणींचे संकेत दिले होते.
(हेही वाचा: वाधवान परिवाराने लॉकडाउनच्या नियमाचे उल्लंघन केल्याने कुटुंबासह 23 जणांवर विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल)
दरम्यान, येस बँक घोटाळ्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या डीएचएफएलचे प्रवर्तक कपिल वाधवन आणि त्याचा भाऊ धीरज यांनी दाखल केलेली अंतरिम जामीन याचिका, रविवारी विशेष कोर्टाने फेटाळून लावली आणि त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. वाधवान बंधूंची सीबीआय कोठडी रविवारी संपली, त्यामुळे त्यांना कोर्टासमोर हजर केले असता कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.