ITR Fraud: आयकर परतावा फसवणूक प्रकरणात एका संशयितास अटक; अंमलबजावणी संचालनालयाची कारवाई

अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) ₹ 263 कोटी आयकर परतावा फसवणूक (Income Tax Refund Fraud Case) आणि मनी लाँडरिंग (Money Laundering) प्रकरणात आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे. पुरुषोत्तम चव्हाण असे या व्यक्तीचे नाव आहे. ईडीने (ED) 20 मे रोजी धाड टाकून त्याला त्याच्या मुंबई येथील त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले.

fraud | (File image)

अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) ₹ 263 कोटी आयकर परतावा फसवणूक (Income Tax Refund Fraud Case) आणि मनी लाँडरिंग (Money Laundering) प्रकरणात आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे. पुरुषोत्तम चव्हाण असे या व्यक्तीचे नाव आहे. ईडीने (ED) 20 मे रोजी धाड टाकून त्याला त्याच्या मुंबई येथील त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. अधिक चौकशीसाठी ईडीने त्याला अटक केली. त्याला ईडी कोर्टासमोर हजर केले असता त्यास 27 मे पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, ही अटक कथित फसवणूक आणि प्राप्तिकराद्वारे एकूण ₹263.95 कोटी रुपयांचा टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स (टीडीएस) रिफंड जारी करण्याच्या चौकशीचा एक भाग आहे, असे ईडीने म्हटले आहे.

कागदपत्रे, विदेशी चलन आणि मोबाईल फोन जप्त

मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीची चौकशी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने दाखल केलेल्या एफआयआरमधून होते. छाप्यादरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी चव्हाण यांच्या घरातून मालमत्तेची कागदपत्रे, विदेशी चलन आणि मोबाईल फोन जप्त केले. ईडीचा दावा आहे की चव्हाण यांनी गुन्ह्यातील रक्कम शोधण्यासाठी आवश्यक असलेले महत्त्वाचे पुरावे नष्ट करून तपासात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. (हेही वाचा, Mumbai: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! 2 बनावट कॉल सेंटर्सचा पर्दाफाश; फोनशी संबंधित घोटाळ्याप्रकरणी 4 जणांना अटक)

लॉन्ड्रिंग प्रकरणी पाचव अटक

दरम्यान, 263 कोटी आयकर परतावा फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आलेला चव्हाण हा पाचवा व्यक्ती आहे. यापूर्वी अटक करण्यात आलेल्यांमध्ये तानाजी मंडल अधिकारी, भूषण पाटील, राजेश शेट्टी आणि राजेश ब्रिजलाल बत्रेजा यांचा समावेश आहे. हे सर्वजण फसवणूक प्रकरणातील आरोपी आणि संशयित आहेत. ईडीने आरोप केला आहे की बत्रेजा आणि चव्हाण सतत परस्परांच्या संपर्कात होते, हवाला व्यवहार आणि गुन्ह्यातील रक्कम वळवण्याशी संबंधित दोषी संदेशांची देवाणघेवाण करत होते. आतापर्यंत, विविध आरोपींची 168 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. सप्टेंबर 2023 मध्ये, ईडीने अधिकारी आणि इतर दहा जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. (हेही वाचा, ED Uncovers Huge Cash In Ranchi: रांची येथे घबाड, तब्बल 30 कोटी रुपयांची रोखड, 6 यंत्रांद्वारे सलग 12 तास उलटले तरी ईडीकडून मोजणी सुरुच (Watch Video))

सायबर फसवणूक प्रकरणांमध्ये वाढ

भारतामध्ये डिजिटल क्रांती झाल्यापासून ऑनलाईन फ्रॉड होण्याच्या घटना वाढत आहेत. ज्यामध्ये सायबर क्राईम, आयटी रिटर्न फ्रॉड, ऑनलाईन खरेदी फसवणूक, क्रिप्टो करन्सी फ्रॉड, इनकम टॅक्स फ्रॉड, ऑनलाईन बँकींग फ्रॉड, शेअर मार्केट फ्रॉड, यांसह इतरही अनेक मार्गांनी नागरिकांची फसवणूक होते आहे. अलिकडेच पुण्यामध्ये सेक्स्टॉर्शन नावाचा प्रकार अधिक व्याप्त स्वरुपात पुढे आला. ज्यामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक, तरुण आणि सामान्यांचाही समावेश आढळून आला. सायबर पोलिसांकडे अशा प्रकरणांबाबत होणाऱ्या तक्रारींचे प्रमाणही काहीसे अधिक आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now