Elvish Yadav Drugs Case: 'वर्षा'वर एल्विश यादवच्या हस्ते आरती; गणेशोत्सवात वर्षा बंगल्यावर येणाऱ्या प्रत्येकाची स्क्रिनिंग करणे शक्य नसल्याचे दिपक केसरकरांचे मत

एल्विशने या प्रकरणामध्ये सारे आरोप फेटाळले आहेत. 0.1% जरी या प्रकरणात माझा हात असेल तर सारी जबाबदारी घेण्यास आपण तयार असल्याचं तो म्हणाला

Rave Party with Snake Venom: Noida Police Arrest Five, YouTuber Elvish Yadav Booked (Photo Credits: X/@Dhruv_tr108)

नोएडातील एका पार्टीत अंमली पदार्थ आणि सापाचे विष पुरवल्याप्रकरणी आरोप असलेला 'बिग बॉस'चा विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याच एल्विशच्या हस्ते वर्षा बंगल्यावर (Varsha Bunglow) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत गणपतीची आरती करण्यात आली होती. एल्विश यादववर झालेल्या आरोपानंतर विरोधकांनी शिंदे सरकारवर जोरदार टिका केली आहे. यानंतर सरकारमधील अनेक मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांचा बचाव केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा बचाव केल्यानंतर राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी देखील सरकारचा बचाव केला. (हेही वाचा - Snake Venom Supply Case: रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाचं विष पोहचवण्याचे सारे आरोप Elvish Yadav ने टाळले; पोलिसांना तपासात मदतीचे आश्वासन (Watch Video))

दीपक केसरकर यांनी या प्रकरणी टीका करणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टिका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जाऊन गणरायाची आरती करणारे अमली पदार्थांचे सेवन करून येतात. हे अतीहुषार असलेल्या संपादकांना दिसतात. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर सर्वसामान्य जनता गणेशत्सवात येतात. त्या प्रत्येकाचं स्क्रिनिंग करण शक्य नाही. वर्षा बंद करून आतमध्ये राहणारे मुख्यमंत्री नसून ते जनतेला भेटणारे मुख्यमंत्री आहेत एवढं जरी राऊतानी समजून घेतलं तरी खूप आहे, अशी टिका दीपक केसरकरांनी यांनी केली आहे.

दरम्यान या प्रकरणावर एल्विशने एक व्हिडिओ जारी करत प्रतिक्रिया दिली आहे. एल्विशने या प्रकरणामध्ये सारे आरोप फेटाळले आहेत. 0.1% जरी या प्रकरणात माझा हात असेल तर सारी जबाबदारी घेण्यास आपण तयार असल्याचं तो म्हणाला आहे.

पाहा व्हिडिओ -

या प्रकरणी तपास आणि चौकशी मध्येही आपण यूपी पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचं तो म्हणाला आहे. एल्विश यादव हा युट्युबर आणि  बिग बॉस ओटीटी 2 चा विजेता आहे.