महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालांवर कॉंग्रेसने उठवलेल्या प्रश्नांसाठी निवडणूक आयोगाने दिली 3 डिसेंबरला भेटीची वेळ

निवडणूक आयोगाने कॉंग्रेसला महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि निवडणूक निकालामध्ये सारी प्रक्रिया पारदर्शीपणे पार पडल्याचं म्हटलं आहे.

Congress | (File Image)

केंद्रीय निवडणूक आयोगाने 3 डिसेंबर दिवशी कॉंग्रेस शिष्टमंडळाला भेटीसाठी बोलावलं आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालामध्ये ईव्हीएम हॅक झाल्याचा संशय विरोधकांनी व्यक्त केला आहे. नाना पटोले यांनी याबद्दल पत्र लिहले आहे. दरम्यान या निवडणूक निकालात महायुतीला एकतर्फी आणि मोठ्या प्रमाणात मिळालेल्या यशाबद्दल अनेकांनी तक्रारी देखील केल्या आहेत.

निवडणूक आयोगाने कॉंग्रेसला महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि निवडणूक निकालामध्ये सारी प्रक्रिया पारदर्शीपणे पार पडल्याचं म्हटलं आहे. मात्र तरीही पक्षाच्या मनात काही शंका असल्यास त्यांचा विचार केला जाईल असं म्हटलं आहे. मतदारांच्या मतदानाच्या आकडेवारीच्या मुद्द्याला उत्तर देताना, निवडणूक आयोगाने सांगितले की त्यात कोणतीही तफावत नाही. डेटा सर्व उमेदवारांकडे मतदान केंद्रनिहाय उपलब्ध आहे आणि तो पडताळला जाऊ शकतो. 'Pet Dog’ Remark: भाई जगताप यांच्या निवडणूक आयोगाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याचा भाजपा कडून निषेध; किरीट सोमय्यांकडून तक्रार दाखल.   

संध्याकाळी 5 नंतर मतदान डेटा आणि अंतिम मतदारांमधील फरक हे प्रक्रियात्मक प्राधान्यांमुळे होते, कारण अधिकारी मतदार मतदानाचा डेटा अद्ययावत करण्यापूर्वी मतदानाच्या जवळ अनेक महत्त्वाची कामं पार पाडतात, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.



संबंधित बातम्या

IND vs AUS 5th Test 2025: ज्यांच्याकडून होती चांगल्या कामगिरीची अपेक्षा त्यांनीच केली निराशा, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील हे 5 खेळाडू ठरले पराभवाचे दोषी

New Zeland Beat Sri Lanka 1st ODI 2025 Scorecard: पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा 9 गडी राखून केला पराभव, विल यंगची 95 धावांची मॅच विनिंग खेळी; वाचा सामन्याचे स्कोअरकार्ड

Australia Qualify WTC Final 2025: ऑस्ट्रेलियाने सलग दुसऱ्यांदा डब्ल्यूटीसी फायनलमध्ये मारली धडक, दक्षिण आफ्रिकेशी होणार सामना; नवीन वर्षात टीम इंडियाचा प्रवास संपुष्टात

AUS Beat IND 5th Test 2025 Day 3 Scorecard: सिडनीमध्ये भारताचा सहा विकेट्स राखून पराभव, ऑस्ट्रेलियाने 10 वर्षांनंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिका जिंकली; भारताचे WTC फायनलचे स्वप्न भंगले