Shivsena Clash: बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी शिवतीर्थावर राडा, दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होणार
तर दुसरीकडे आम्हाला स्मृतीदिनाच्या कार्यक्रमाची तयारी करायची असल्याने आम्ही त्याठिकाणी गेलो होते, असं ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी म्हटले.
शिवसेना प्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मृतीस्थळावर गुरुवारी शिवसेना शिंदे गट (Shiv Sena Shinde Faction) आणि ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) कार्यकर्ते भिडले. दोन्ही बाजूंनी धक्काबुक्की आणि घोषणाबाजी देखील देण्यात आल्या. जवळपास तीन-साडेतीन तास शिवाजी पार्क परिसरात गोंधळ सुरू होता. अखेर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची समजूत काढत परिसर रिकामा केला. त्यानंतर आता, पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. या प्रकरणी दोन्ही कार्यकर्त्यांवर आता कारवाई करण्यात येणार आहेत. याबाबत आजूबाजूला असलेल्या सीसीटीव्ही आणि रेकॉर्डिंगवरून पोलीस (Mumbai Police) चौकशी करणार आहे. (हेही वाचा - Bal Thackeray Smrutidin 2023: बाळ ठाकरेंच्या स्मृतिदिनी नातू आदित्य ठाकरे यांची भावनिक पोस्ट)
बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळ परिसरात झालेल्या राड्याच्यावेळी पोलिसांनी कारवाई करा अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली होती. तर दुसरीकडे आम्हाला स्मृतीदिनाच्या कार्यक्रमाची तयारी करायची असल्याने आम्ही त्याठिकाणी गेलो होते, असं ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी म्हटले. दरम्यान, पोलिसांनी आता परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली आहे.पोलीस सर्व घटनाक्रम तपासून गुन्हे नोंदवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बाळासाहेब स्मृतीस्थळावर नक्की काय घडलं याबाबत आजूबाजूला असलेल्या सीसीटीव्ही आणि रेकॉर्डिंगवरून चौकशी करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
या राड्यावरुन संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधत टीका केली होती. त्यामुळे कायदा आणि प्रश्न सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर कॅबिनेट बैठकीत चर्चा होऊ शकते.