Eknath Khadse On BJP Leadership: बहुजनांना डावलण्याच्या नेतृत्वाच्या वृत्तीमुळे भाजपची सत्ता गेली- एकनाथ खडसे

आम्हाला तिकीट का नाकारले हेसुद्धा सांगण्यात आले नाही. इतकेच नव्हे तर ज्या बहुजन नेत्यांना तिटीटे दिली त्यांचा पराभव कसा होऊ शकेल, याचीही काळजी घेतली गेली. नेतृत्वाच्या या वृत्तीमुळेच पक्षाची राज्यातील सत्ता गेली, असे खडसे यांनी म्हटले आहे.

Eknath Khadse | (File Photo)

भाजपमधील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पुन्हा एकदा पक्षातील नेत्यांसह विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणीस (Devendra Fadnavis) यांच्यावर नाव न घेता टीकास्त्र सोडले आहे. पक्षातील ओबीसी (OBC) आणि बहुजन नेत्यांना डावलण्याच्या नेतृत्वाच्या वृत्तीमुळेच महाराष्ट्रात भाजपची सत्ता येऊ शकली नाही. बहुजन नेतृत्व वाढू द्यायचे नाही हा डाव या पाठिमागे असल्याचा दावा करत एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजप (BJP) नेत्यांवर तोफ डागली आहे.

एकनाथ खडसे यांनी म्हटले की, केवळ मीच नव्हे तर पक्षातील पंगजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांच्या बाबततीतही असेच घडले आहे. आम्हाला तिकीट का नाकारले हेसुद्धा सांगण्यात आले नाही. इतकेच नव्हे तर ज्या बहुजन नेत्यांना तिटीटे दिली त्यांचा पराभव कसा होऊ शकेल, याचीही काळजी घेतली गेली. नेतृत्वाच्या या वृत्तीमुळेच पक्षाची राज्यातील सत्ता गेली, असे खडसे यांनी म्हटले आहे.

आपण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होतो. त्यामुळे जाणीवपूर्वक आपल्याला घोटाळा प्रकरणात अडकवण्यात आले. माझ्यावर जे घोटाळ्याचे आरोप झाले त्याचा कोणताही पुरावा मिळाला नाही. ज्या मनिष भंगाळे यांनी माझ्यावर आरोप केले. दाऊदशी संबंध असल्याचे सांगितले हाच भंगाळे रात्री दीड वाजता तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटला होता. ही भेट का घडली याबाबतही तपशील पुढे आला नाही. इतकेच नव्हे तर दाऊदशी संबध असल्याच्या आरोपामध्ये जी फोन क्रमांकाची यादी होती त्यात माझ्यासोबत आमचे संघटनमंत्री व्ही सतीश यांचेही नाव होते. असे असताना केवळ एकनाथ खडसे यांनाच लक्ष्य करण्यात आले, असेही एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, 'मी पुन्हा येईन हे जनतेला आवडले की नाही? याचा शोध घेईन' असे म्हणत भाजप नेते एकनाथ खडसे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला)

एकनाथ खडसे यांना संपविण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. परंतू, एकनाथ खडसे इतक्यात संपणार नाही. माझ्यावर झालेला अन्याय या आधीही मी पक्ष नेतृत्वाच्या निदर्शनास आणून दिला आहे. या पुढेही निदर्शनास आणून देत राहीण. माज्यावर झालेले आरोप का झाले, त्यामागे कोण आहेत. कोणत्या मंत्र्यांचे, नेत्यांचे पीए काम करत होते, याचा सर्व तपशील पुराव्यासह माझ्याकडे आला आहे. लवकच यावर एक पुस्तक लिहीणार असल्याचेही एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.