ED on Nawab Malik's Bail Plea: 'नवाब मलिक यांची जामीन याचिका म्हणजे कायद्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न'; ईडीचे न्यायालयात उत्तर

ते म्हणाले की, मलिक हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते आणि त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना स्ट्रेचरवर आर्थर रोड तुरुंगातून जेजे रुग्णालयात नेण्यात आले

Nawab Malik (Photo Credit - Twitter)

महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सोमवारी तुरुंगातून रुग्णालयात नेण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, नवाब मलिक यांची प्रकृती तीन दिवसांपासून खराब होती. वैद्यकीय आधारावर त्यांनी विशेष न्यायालयासमोर जामीन अर्ज दाखल केला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने आज मुंबईतील विशेष न्यायालयात त्यांच्या जामीन अर्जावर उत्तर दाखल केले. अंमलबजावणी संचालनालयाने नवाब मलिक यांच्या शस्त्रक्रियेसाठी 6 आठवड्यांचा जामीन मागणाऱ्या अर्जाला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, नवाब मलिक या जमीन याचिकेद्वारे कायद्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत आहेत.

किडनीच्या आजारासाठी खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यासाठी मलिक यांनी तात्पुरता जामीन मागितला होता. ईडीने सांगितले की, सरकारी रुग्णालयातही वैद्यकीय उपचार उपलब्ध आहेत त्यामुळे त्यांना जामीन मिळू नये. नवाब मलिक यांच्या अंतरिम याचिकेबाबत ईडीने सांगितले, मलिक यांना अंतरिम जामीन मिळाल्यास त्यांना खाजगी रुग्णालयात हलवले जाऊ शकते व हा दिलासा मिळवून त्यांना कायद्याच्या प्रक्रियेतून बाहेर पडायचे आहे.

या जामिनाद्वारे त्यांना त्यांच्या आवडीच्या हॉस्पिटलशी संगनमत करून प्रदीर्घ आरोग्य समस्यांच्या बहाण्याने बाहेर राहण्याची संधी मिळू शकते. जेजे रुग्णालय ही एक सुसज्ज सरकारी आरोग्य सुविधा आहे जिथे ते राहू शकतात त्यामुळे ही याचिका म्हणजे जामीन मिळवण्यासाठी केलेली एक युक्ती आहे. (हेही वाचा: राणा दाम्पत्य 4 मेपर्यंत राहणार तुरूंगात, मुंबई सत्र न्यायालयात बुधवारी होणार सुनावणी)

नवाब मलिक यांची प्रकृती खालावली असल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले. ते म्हणाले की, मलिक हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते आणि त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना स्ट्रेचरवर आर्थर रोड तुरुंगातून जेजे रुग्णालयात नेण्यात आले. यावर मंत्र्याची प्रकृती बिघडल्याचे तपास यंत्रणेला का कळवले नाही, अशी विचारणा ईडीने केली. ईडीने पुढील तारखेला याबाबत सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. विशेष न्यायाधीश आर. एन. रोकडे यांनी तुरुंग अधिकाऱ्यांनी मलिक यांच्या प्रकृतीबाबत न्यायालयाला माहिती न दिल्याबद्दल आणि त्यांना रुग्णालयात न नेल्याबद्दल चिंता व्यक्त केली. याबाबत न्यायमूर्तींनी रुग्णालयाकडून अहवाल मागवला असून पुढील सुनावणीची तारीख 5 मे निश्चित केली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif