Monsoon Update: पूर्व विदर्भात येत्या 3-4 तासांत मुसळधार पावसाची शक्यता; नागरिकांनी काळजी घ्या- हवामान विभाग प्रमुख के एस होसाळीकर
पूर्व विदर्भात येत्या काही तासांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
महाराष्ट्रात पावसाने चांगलाच जोर धरला असून मुंबईसह कोकण, ठाणे, पालघर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला आहे. आज मुंबई, ठाण्यातील काही भागात पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरीही विदर्भात मात्र रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. पूर्व विदर्भात काळे ढग जमा झाले असून येत्या 3-4 तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी कृपया काळजी असे आवाहन हवामान विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर (K S Hosalikar) यांनी केले आहे.
पूर्व विदर्भात येत्या काही तासांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. Maharashtra Monsoon 2020 Update: मुंबई, ठाणे, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात येत्या 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता- IMD
1 जूनला केरळमध्ये मान्सून आल्यानंतर 3 जूनला महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळाने झोडपलं. त्यानंतर मान्सून आगमनाबाबत शंका निर्माण झाली होती. मात्र हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार 11 जून रोजी महाराष्ट्रात अपेक्षेप्रमाणे मान्सूनचं आगमन झालं. त्यानंतर जुलै महिन्यात आणि ऑगसट्या पहिल्या आठवड्यात पावसाने मुंबई सह पश्चिम किनारपट्टीला झोडपून काढलं.
राज्यात इतरत्र 20 ते 22 ऑगस्टपर्यंत कमी-अधिक प्रमाणात पाऊस राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. दरम्यान पुणे, मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईतील पाणी कपात 20% वरुन 10% वर करण्यात आली आहे.