Fraud Exam: डीवायएसपींनी एलएलबी परीक्षेत स्वतःच्या नावाने बसवला डमी उमेदवार, खुद्द पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

डीवायएसपी सुधीर खिरडकर यांनी मुंनाभाई प्रमाणे शक्कल लढवत थेट एलएलबीची परीक्षा पास करण्याचं नियोजन केलं.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- फेसबुक)

हल्ली नोकरी (Job) करत असताना आपलं मधेचं रखडलेलं शिक्षण अनेक जण पुर्ण करतात. पण परिक्षा अभ्यास या सगळ्या गोष्टी नोकरी दरम्यान पुर्ण करणं म्हणजे अवघडचं. पण बरेचं जण या दोन्ही चा मध्य साधत नोकरीसह आपलं शिक्षण (Education) पूर्ण करतात. पण जालना (Jalna) येथील तत्कालीन डीवायएसपी सुधीर खिरडकर (DYSP Sudhir Khiradkar) यांनी मुंनाभाई एमबीबीएस (Munna Bhai MBBS) प्रमाणे शक्कल लढवत थेट एलएलबीची परीक्षा (LLB Exam) पास करण्याचं नियोजन केलं. कायद्याचा रक्षकचं कायदा हातात घेवून आडमार्गाने परिक्षा पास करण्यासाठी एका अजब मार्गाचा उपयोग केला. फेब्रुवारी 2020 साली झालेल्या एलएलबी परीक्षेत सुधीर खिरडकर (Sudhir Khiradkar) यांनी डमी उमेदवार म्हणून पोलीस शिपायास बसवल्याची तक्रार करण्यात आली होती. तसेच या तक्रारीला धरुन डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (Dr.  Babasaheb Ambedkar Marathwada University) चौकशी समितीने तत्कालीन डीवायएसपी सुधीर खिरडकरसह पोलिस शिपायास दोषी ठरविले होते.

 

तरी आता डीवायएसपी सुधीर खिरडकर (DYSP Sudhir Khiradkar) आणि शिपायां विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.  सुधीर खिरडकर यांनी दिनांक 4  फेब्रुवारी 2020 ते दिनांक 8 फेब्रुवारी 2020  दरम्यान विधी शाखेच्या पदवीचे एकून 05 पेपर दिलेले आहेत. या सर्व उत्तरपत्रीकांवरील (Answer Sheet) परीक्षार्थीची स्वाक्षरी (Signature) आणि पेपरनिहाय उपस्थिती पत्रकावरील परीक्षार्थीची मुळ स्कॅन केलेली स्वाक्षरी यात मोठा फरक आहे. यावर हा घोळ लक्षात आला आहे. तसेच एकूण 5 पेपर पैकी एक दोन नाही तर सगळे पाचही पेपर डमी परिक्षार्थ्याने (Dummy Student) सुधीर खिरडकर यांच्या नावाने दिले आहेत. (हे ही वाचा:- Pune: पुण्यात फूड डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा विनयभंग; जबरदस्तीनं घेतलं चुंबन, आरोपीला अटक)

 

रीमा खरात-काळे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने (Dr.  Babasaheb Ambedkar Marathwada University) व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ विलास खंदारे (Dr. Vilas Khandare) यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमली. या समितीने 9 मे 2022 रोजी आपला चौकशी अहवाल विद्यापीठास सादर केला असुन प्रकरणातील दोषींवर आता गुन्हा नोंदवण्यात आला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif