IPL Auction 2025 Live

Coronavirus च्या पार्श्वभूमीवर पुण्यात जमावबंदीची शक्यता, आज होऊ शकते महत्वपूर्ण निर्णय

जमावबंदी लागू झाल्यास चारपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मज्जाव केला जातो.

Coronavirus Outbreak | Representational Image (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरससारखे (Coronavirus) भयाण संकट सध्या जगभरात घोंघावत असून महाराष्ट्रालाही त्याची झळ पोहोचू लागली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून मुंबईत जमावबंदी करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आता पुण्यामध्येही जमावबंदी लागू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मटा ने दिलेल्या वृत्तानुसार, आज याबाबत महत्वपूर्ण निकाल लागू शकतो असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले आहे. तसेच ही जमावबंदी संपूर्ण पुणे (Pune) शहरात करायची की ठराविक भागात याबाबतचा निर्णय देखील आज घेतला जाईल.

कोरोना व्हायरसचे लोण सा-या जगभरात पसरले काही देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. गर्दीचे आणि गजबलेले शहर असलेल्या मुंबईत जमावबंदी लागू केली आहे. त्यामुळे पुण्यातही जमावबंदी लागू करायची की नाही ते आज निश्चित केले जाईले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्यादृष्टीने खबरदारी म्हणून कलम 144 (Article 144) लागू केले जाण्याची शक्यता आहे. जमावबंदी लागू झाल्यास चारपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मज्जाव केला जातो.

शाळा-महाविद्यालयांना सुद्धा 31 मार्च पर्यंत सुट्टी जाहिर केली आहे. एवढेच नाही तर गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. तर मुंबईतील राणीबाग नागरिकांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर पुण्यात सर्वाधित कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने तेथील शाळा बंद केल्यानंतर आता अंगणवाड्या सुद्धा बंद ठेवण्यात येणार आहे.

जाणून घेऊयात कलम 144 म्हणजे काय?

-फौजदारी दंडसंहिता 1973 मध्ये कलम 144 (जमावबंदी) चा समावेश आहे. जेव्हा आंदोलन किंवा सभेच्या रूपात एखाद्या ठिकाणी चार हुन अधिक माणसे जमतात, आणि त्यांच्या कृत्याने त्या परिसरात कायदा व सुव्यवस्थेला धोका बसण्याची शक्यता असते तिथे हा कलम लागू केला जातो.

-कलम 144 ला इंग्रजी मध्ये कर्फ्यू (Curfew) म्ह्णून देखील संबोधले जाते.

-कलम लागू करताना हिंसा घडण्याआधी संभाव्य परिस्थिती मध्ये किंवा घटना सुरु झाल्यावर लगेचच लागू केला जातो. Coronavirus: क्रिकेटपटू धवल कुलकर्णी म्हणाला सलाम BMC! मुंबई महापालिका म्हणाली 'हे तर आमचे कर्तव्य'

-जमावबंदीचा आदेश हा जिल्हाधिकारी किंवा जिल्हा न्याय दंडाधिकारी किंवा इतर कार्यकारी दंडाधिकारी देऊ शकतात.

-एखाद्या ठरविक व्यक्तीला काही खास कृती करण्यापासून प्रतिबंध लावण्याचे निर्देश देखील या अंतर्गत दिले जाऊ शकतात. यासाठी काही अटी आणि नियम आहेत.

-जमावबंदी लागू झाल्यावर त्या ठिकाणी खाजगी वाहने व चार हुन अधिक व्यक्तींना एकत्र प्रवेशास बंदी लावण्यात येते. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर MPSC च्या परिक्षा पुढे ढकलण्याची राज्य सरकारकडून सुचना

-कोणत्याही भागामध्ये दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ जमावबंदीचा आदेश लागू करता येत नाही. एखाद्या ठिकाणी दोन महिने जमावबंदी लागू केल्यानंतर ती संपुष्टात आल्यावर पुन्हा नव्याने जमावबंदीचा आदेश काढता येतो.

-अपवादत्मक परिस्थिती मध्ये नागरिकांच्या जीवाला किंवा आरोग्याला धोका असेल वा दंगलीची संभावना असेल तर राज्य सरकार तर्फे जमावबंदी 6 महिन्यांपर्यंत सुद्धा लागू केली जाऊ शकते.

-या नियमाचे पालन न करणाऱ्यास एका वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते.