Mumbai: मुंबईतील शिवडी रेल्वे स्थानकावर एका माथेफिरूने दारू पिऊन घातला धिंगाणा; पोलिसांवर चाकू हल्ला केल्यानंतर रेल्वे कार्यालयाचीही केली तोडफोड

ही घटना शिवडी रेल्वेस्थानकात आज (15 फेब्रुवारी) सकाळी घडली आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

मुंबईतील (Mumbai) शिवडी रेल्वे स्थानकावर (Sewri Railway Station) दारूच्या नशेत तर्रर्र असेलेल्या एका माथेफिरूने रेल्वे स्थानकावर धुमाकूळ घातल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना शिवडी रेल्वेस्थानकात आज (15 फेब्रुवारी) सकाळी घडली आहे. हा तरूण धारदार चाकू घेऊन फिरत असल्याने शिवडी रेल्वे स्थानकावर तणावाचे वातारण निर्माण झाले होते. दरम्यान, या माथेफिरू तरुणाने रेल्वे पोलिसांवर चाकू हल्ला केला आहे. तसेच रेल्वे स्टेशन मास्टरच्या ऑफिसची सुद्धा तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या तरुणाला अटक केली असून पुढील तपास करत आहे.

मुंबई मिररने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी शिवडी रेल्वे स्थानकावर एक माथेफिरू तरून धारदार चाकू घेऊन फिरत होता. रेल्वे प्रशासनाला याची माहिती होताच, त्यांनी या तरूणाला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी या तरूणाने रेल्वे पोलिसांवरच हल्ला केला. त्यावेळी पोलीस आणि तरूणामध्ये बराच वेळ झटपट सुरु होती. अखेर पोलीस शिपाई निलेश जगदाळे यांनी मोठे धाडस दाखवून त्या माथेफिरूला पकडले. त्यानंतर पोलिसांनी त्याला रेल्वे स्टेशन मास्टरच्या केबिनमध्ये बंद केले. मात्र, दारूच्या नशेत तर्रर्र असलेल्या या तरुणाने रेल्वे मास्टरच्या केबिनची तोडफोड केली, यात तो स्वत:ही जखमी झाला आहे. हे देखील वाचा- Mumbai: जुन्या प्रेमसंबंधातून तरूणाकडून एका विवाहित महिलेवर चाकू हल्ला; मुंबईच्या केईएम रुग्णालय परिसरातील धक्कादायक घटना

शिवडी स्थानकात आज घडलेल्या या प्रकारानंतर प्रवाशांमध्ये भिती पसरली आहे. दारूच्या नशेत तर्रर्र असलेला हा तरूण कोणत्याही प्रवाशांवर हल्ला करण्याची शक्यता होती. सध्या पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्याजवळ असलेला चाकू जप्त केला आहे. तसेच आपल्याला आणखी दारू न मिळाल्याने या तरूणाने असे कृत्य केल्याचे पोलीस चौकशीतून समोर आले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif