Taxi Driver Found Dead Inside Vehicle: माटुंगा पोलीस स्टेशनजवळ टॅक्सीमध्ये सापडला चालकाचा मृतदेह; हृदयविकाराच्या झटका आल्याचा अंदाज

प्राथमिक अहवालानुसार त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. कारण चालकाच्या शरीरावर कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत.

Heart Attack | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Taxi Driver Found Dead Inside Vehicle: शिवडी क्रॉस रोड (Sewree Cross Road) वरील माटुंगा पोलीस ठाण्याजवळ (Matunga Police Station) एका टॅक्सीमध्ये मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मृत व्यक्ती हा टॅक्सी चालक होता. प्राथमिक अहवालानुसार त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) झाला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. कारण चालकाच्या शरीरावर कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत.

टॅक्सीमध्ये मृतावस्थेत आढळला कॅब चालक -

माटुंगा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी पोलिसांना एक फोन आला, ज्यामध्ये फोन करणाऱ्या व्यक्तीने त्यांना टॅक्सीत एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले आणि टॅक्सीमध्ये बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीला सायन रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. (हेही वाचा - Mumbai Shocker: महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या वडाळ्यातील 12 वर्षीय मुलाचा शीर नसलेला मृतदेह सापडला; अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल)

अस्लम शेख (वय, 40) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. अस्लम शेख हा वडाळा येथील रहिवासी आहे. शेखचा मृतदेह ज्या टॅक्सीत सापडला त्या टॅक्सीभोवतीचे सीसीटीव्ही तपासल्यानंतर आढळून आले की, रविवारी दुपारी टॅक्सी चालक टॅक्सी घेऊन शिवडी क्रॉस रोडवर आला. त्याने टॅक्सी एका बाजूला उभी केली. मात्र, टॅक्सी पार्क केल्यानंतर शेख टॅक्सीच्या बाहेर पडला नाही. (हेही वाचा -Pune Koyta Gang: कोयत्या गँगचा धुमाकुळ सुरुच, स्कुल व्हॅनवरच्या हल्ल्यात चालक जखमी,अल्पवयीन आरोपींना अटक)

माटुंगा पोलिसांनी सांगितले की, अस्लम शेख हे विवाहित आहे. मात्र त्यांची पत्नी त्याच्यासोबत राहत नसल्याचे निष्पन्न झाले आहे. शेख यांना दारू पिण्याचे व्यसन होते, त्यामुळे त्यांचे पत्नीसोबत वाद होत असतं. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अस्लम शेख यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. प्रथमदर्शनी शेख यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात येत आहे.