नागपूर: अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्याचे टक्कल करून जाळण्याचा प्रयत्न

नागपूर येथे एका शालेय विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या इसमाला संतप्त जमावाने मराहण केल्याचं समजत आहे, इतकंच नव्हे तर या नागरिकांनी आरोपीचे टक्कल करून त्याला जिवंत जाळण्याचा सुद्धा प्रयत्न केला आहे.

Representational Image (Photo Credits: ANI)

अलीकडे, छेडछाड, जबरदस्ती, घरगुती हिंसा या घटना वारंवार समोर येत असतात, तितक्याच यातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी मागण्याही होत असतात, पण दुर्दैवाने याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे आता नागरिकांनी स्वतःच या नराधमांना शिक्षा देण्याचा मार्ग स्वीकारला आहे.

नागपूर (Nagpur)  मध्ये काल म्हणजेच मंगळवारी इमामवाडय़ातील इंदिरानगर (Indira Nagar) या भागात एका शाळेच्या व्हॅनमध्ये सहा वर्षीय विद्यर्थिनीशी अश्लील चाळे (Molestation) करणाऱ्या चालकाला नागरिकांनी रंगेहात पकडून चांगलाच चोप दिला. इतकंच नव्हे तर, संतप्त नागरिकांनी त्याचे टक्कल करून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलीस पोहोचल्याने अनर्थ टळला.आशीष मनोहर वर्मा असे या आरोपीचे नाव असून पोलिसांनी याप्रकरणी त्याच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, पीडित विद्यर्थिनी ही अवघ्या सहा वर्षांची असून इयत्ता दुसरीत शिकत आहे, तर तिचा 14 वर्षीय भाऊ त्याच शाळेत 7 वीत शिकत आहे. दुपारी शाळा सुटल्यावर आशिष वर्मा विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी जात होता. इंदिरानगर भागात व्हॅनमध्ये त्याने विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करायला सुरुवात केली. हा प्रकार रस्त्याने जाणाऱ्या एका तरुणीने बघितला. तिने आरडाओरड केली. हा गोंधळ ऐकताच नागरिकांनी तिथे धाव घेतली. नागरिकांनी आशीष याला व्हॅनबाहेर काढून चांगलाच चोप दिला. त्याचे टक्कल केले. व्हॅनची तोडफोड केली.इतकंच नव्हे तर त्यांनी आशीषला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. अंधश्रद्धेचा कहर! परिवारासमवेत नग्न होऊन शिक्षक देत होता तीन वर्षाच्या मुलीचा बळी, वाचा नेमकं घडलं काय?

दरम्यान या इमामवाडा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.एम. साळुंखे व पोलिस उपनिरीक्षक ए.पी. जाधव याठिकाणी पोहोचले.सर्वात आधी त्यांनी नागरिकांच्या तावडीतून आशीष याची सुटका करून मेडिकलमध्ये दाखल केले. उपचारानंतर सुटी होताच उशिरा रात्री त्याला अटक करण्यात आली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif