Dr. Shivling Shivacharya Maharaj: डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज कार्य आणि अल्पपरीचय

शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी भक्तीस्थळ स्थापन कले. या भक्तीस्थळावर महादेव मंदीर आणि प्रार्थनास्थळ आहे. या ठिकाणीच महाराज वास्तव्यास होते.

Dr. Shivling Shivacharya | (PC- You Tube)

डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज (Dr. Shivling Shivacharya) यांचे आज (1 सप्टेंबर 2020) निधन झाले. वय वर्षे 104 असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वतंत्र्य पूर्व काळापासूनच डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज कार्यरत होते. लिंगायत समाजातील नावाजलेल्या महाराजांपैकी एक अशी त्यांची ओळख होती. त्यांना पाकिस्तानातील लाहोर विद्यापीठ (University of Lahore) येथून वैद्यकीय अभ्यासक्रमांची पदवी मिळाली आहे. लातूर जिल्ह्यातील पहिले डॉक्टर अशीही त्यांची ख्याती होती.

नांदेड रोड परिसरात चौदा एकर परिसरात 2007 मध्ये डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी भक्तीस्थळ स्थापन कले. या भक्तीस्थळावर महादेव मंदीर आणि प्रार्थनास्थळ आहे. या ठिकाणीच महाराज वास्तव्यास होते. या ठिकाणी सामाजिक कार्यही केले जाते. भक्तीस्थळावरील जागा सामुहिक विवाहासाठीही विनामुल्य मोबदल्यात उपलब्ध करुन दिली जाते.(हेही वाचा, Shivling Shivacharya Maharaj Passes Away : शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे वयाच्या 104 वर्षी निधन )

मराठवाडा उर्वरीत महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्येही डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे भक्त मोठ्या प्रमाणावर आहेत. प्रामुख्याने श्रावण महिन्यात होणाऱ्या अनुष्ठानाला भाविक महाराजांच्या भक्तीस्थळावर मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. डॉ. शिवलिंग शिवाचार्य यांच्या निधनामुळे त्यांच्या अनुयायांमध्ये मोठ्या प्रमाणवर दु:ख व्यक्त केले जात आहे.