IPL Auction 2025 Live

Dr.Prakash Amte Tested COVID19 Positive: जेष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण

रिपोर्ट्सनुसार, 72 वर्षीय आमटे यांना पुढील उपचारासाठी नागपूर मधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रकाश आमटे (Photo Credit : Facebook)

Dr.Prakash Amte Tested COVID19 Positive:  जेष्ठ समाजसेवक आणि पद्मश्री पुरस्कार विजेते प्रकाश बाबा आमटे यांना कोरोनाची लागण झाली आहे. रिपोर्ट्सनुसार, 72 वर्षीय आमटे यांना पुढील उपचारासाठी नागपूर मधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आमटे यांना गेल्या काही दिवसांपासून बरे वाटत नव्हते. पण त्यांची RAT-PCR चाचणी सुद्धा निगेटिव्ह आली.  त्यानंतर सुद्धा त्यांची प्रकृती सुधारली नाही आणि पुन्हा चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आमटे यांना त्यांच्या समाजकार्यासाठीी नॅशनल आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आनंदवन, लोकबिरादारी आणि सोमनाथ प्रकल्प काही दिवसांसाठी बंद राहणार आहे. तर सध्या नागपूरातील एका रुग्णालयात प्रकाश आमटे यांच्यावर उपचार केले जाणार आहेत.(अभिमानास्पद! डॉ. प्रकाश आमटे यांचा बिल गेट्स यांच्या हस्ते गौरव)

दरम्यान, 10 ऑक्टोंबर 2014 मध्ये डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या आयुष्यावरील एक चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. त्यामध्ये प्रकाश आमटे यांची भुमिका नाना पाटेकर तर त्यांच्या पत्नीची भुमिका सोनाली कुलकर्णी यांनी साकारली होती. हा चित्रपट मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत सुद्धा प्रदर्शित केला गेला होता. आमटे यांना 2002 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

प्रकाश आमटे आपल्या पत्नीसह गेली चार दशके आरोग्यासोबतच शिक्षण, आदिवासींची उपजिविका आणि वन्यजीव संरक्षण यामध्ये काम करत आहेत. तसेच ते महाराष्ट्रात गडचिरोलीमध्ये अनाथ जंगली प्राण्यांसाठी अनाथालय चालवतात. 1973 साली सुरू झालेल्या प्राण्यांच्या अनाथालयाला 1991 मध्ये रेस्क्यू सेंटरची मान्यता मिळाली.