Dr. Payal Tadvi Suicide Case: नायर हॉस्पिटलची मान्यता रद्द करा - तडवी कुटुंबीयांची मागणी

मीडियाशी बोलताना तडवी कुटुंबीय आणि पायलच्या पतीने लवकरात लवकर पायलला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.

Payal Tadvi Husband (Photo Credits: Twitter)

मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये (Nair Hospital) जातीवादातून 26 वर्षीय डॉ. पायल तडवी (Dr. Payal Tadvi) या शिकाऊ डॉक्टरचा बळी गेला. आत्महत्या करून पायलने आपला जीव संपवल्यानंतर आता 5 दिवसांनंतर तडवी कुटुंबीयांसह स्थानिक नेत्यांनी नायर हॉस्पिटल परिसरात आंदोलन करण्यास सुरूवात केली आहे. मीडियाशी बोलताना तडवी कुटुंबीय आणि पायलच्या पतीने लवकरात लवकर पायलला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. पायलची आत्महत्या नसून ती हत्या झाल्याचं मत तिच्या कुटुंबीयांनी व्यक्त केलं आहे.  'मार्ड' च्या कारवाईनंतर नायर हॉस्पिटलच्या प्रसुती विभाग प्रमुख सह 4 डॉक्टर्सचं निलंबन

ANI Tweet

Dr Salman, Payal Tadvi's (who committed suicide on May 22 after facing harassment at the hands of 3 senior doctors) husband: We want govt to intervene, police is not taking any action. It is possible Payal was murdered by the 3 women doctors. #Mumbai pic.twitter.com/oYPt3ki8Cl

पायलच्या आईने नायर हॉस्पिटलची मान्यता रद्द करावी अशी संतप्त मागणी करताना संबंधित डॉक्टरांना जन्मठेप व्हावी असं म्हटलं आहे. तर पायलच्या पतीने प्रशासनाने पायल तडवीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचं म्हटलं आहे. पायल तडवीच्या आत्महत्येनंतर अनेकांनी या प्रकरणात संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. यामध्ये अनेक राजकीय पक्ष देखील तडवी कुटूंबीयांसोबत आंदोलनात उतरणार आहे.

मार्डच्या कारवाईनंतर आज पायल तडवी आत्महत्येला कारणीभूत ठरणार्‍या सिनियर डॉक्टर्स आणि युनिट हेडचं निलंबन करण्यात आलं आहे.