Dr. Payal Tadvi Suicide Case: आरोपींविरोधी सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल
मुंबईतील नायर हॉस्पिटलमधील शिकाऊ डॉ. पायल तडवी (Dr. Payal Tadvi) आत्महत्या प्रकरण दिवसेंदिवस अधिकच गुंतागुंतीचे होत चालले आहे. या प्रकरणात ज्या 3 महिला आरोपींना अटक करण्यात आली होती त्यांच्या विरोधात आज किंवा उद्या सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल होणार आहे, अशी माहिती गुन्हे शाखेने दिली आहे.
मुंबईतील नायर हॉस्पिटलमधील शिकाऊ डॉ. पायल तडवी (Dr. Payal Tadvi) आत्महत्या प्रकरण दिवसेंदिवस अधिकच गुंतागुंतीचे होत चालले आहे. या प्रकरणात ज्या 3 महिला आरोपींना अटक करण्यात आली होती त्यांच्या विरोधात मुंबई गुुन्हेे शाखेने आज सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
नायर हॉस्पिटलमधील 26 वर्षीय शिकाऊ डॉक्टर पायल तडवीच्या कथित रॅगिंग आणि आत्महत्या प्रकरणानंतर वैद्यकीय क्षेत्रात सारेच सुन्न झाले होते. याप्रकरणी पायलला त्रास देणार्या भक्ती मेहेर (Bhakti Mehre), डॉ हेमा अहुजा (Hema Ahuja) आणि डॉ अंकिता खंडेलवाल (Ankita Khandelwal) तीन सिनियर डॉक्टर्सना मुंबईमध्ये अटक करण्यात आली होती.
हॉस्पिटलमधील सिनियर महिला डॉक्टर्सकडून सातत्याने जातीवरुन बोलणी ऐकावी लागत असल्याने पायलने गळफास घेत 22 मे रोजी आपले जीवन संपवले. पायल तडवीने लिहिलेल्या सुसाईट नोटमध्ये जातीवरुन शेरेबाजी करत असल्याचा उल्लेख केला असून या प्रकरणातील आरोपी सिनियर डॉक्टर्सची नावांचाही खुलासा करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारत दंड संहितेच्या कलम 201 अंतर्गत पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात केला.
आता यातील तिनही महिला आरोपींविरुद्ध आरोपपत्र सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून पुढील प्रक्रिया सुरु आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jul 23, 2019 05:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

