Devendra Fadnavis On Dombivli Fire Incident | | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

डोंबिवली एमआयडीसीमधील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट (Dombivli MIDC Blast) झाल्याने भीषण आग लागली. आगीमध्ये अनेक कामगार अडकल्याने त्यांना मदत आणि बचाव कार्य सुरु झाले. दरम्यान, या आगीवरुन राजकीय नेत्यांनीही भाष्य केल्याने घटनेला वेगळीच किनार लाभली. दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या आगीवर भाष्य करत माहती दिली आहे. डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना दु:खद आहे. या घटनेत 8 जण या घटनेत अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. जखमींच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून आणखी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत, असे फडणवीस यांनी सोशल मीडिया मंच 'X' द्वारे केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

फडणवीस यांनी एक्स पोस्टमध्ये काय म्हटले?

देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना दु:खद आहे. 8 जण या घटनेत अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. जखमींच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून आणखी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकार्‍यांशी माझी चर्चा झाली असून, तेही 10 मिनिटांत घटनास्थळी पोहोचत आहेत. एनडीआरएफ, टीडीआरएफ, अग्नीशमन दलाच्या चमू पाचारण करण्यात आल्या आहेत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.' (हेही वाचा, Boiler Explosion at Factory in Dombivli: डोंबिवली मध्ये MIDC भागातील एका फॅक्टरी मध्ये बॉयलरचा स्फोट झाल्याने भडकली आग (Watch Video))

एक्स पोस्ट

स्फोटांमुळे खिडक्यांची तावदाणे फुटली, भींतींनाही तडे

दरम्यान, प्राप्त माहितीनुसार, डोंबिवलीतील एका रासायनीक कंपनीमध्ये गुरुवारी (23 मे) झालेल्या स्फोटामुळे डोंबिवलीच्या एमआयडीसी परिसरात असलेल्या कारखान्याला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या दहाहून अधिक गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कारखान्यातून तीन स्फोट झाल्याचे आवाज ऐकू आले. स्फोटानंतर पुढच्या काहीच क्षणांमध्ये मोठ्या प्रमाणावर आग भडकली. आगीची माहिती मिळताच तातडीने मदत आणि बचावकार्य सुरु झाले. पुढच्या काहीच वेळात जवळपास सुमारे 30 जणांना बाहेर काढण्यात यश मिळाले. मात्र, 8 जण आगीतच अडकले.

व्हिडिओ

आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. त्यांच्यासोबत रुग्णवाहीकाही उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आगीवर पूर्ण नियंत्रण मिळविण्यासाठी जवळपास चार तासांहून अधिक काळ लागू शकतो. अधिकाऱ्यांनी स्थानिक माहितीनुसार सांगितले की, स्फोट इतका प्रचंड होता की, स्फोटाच्या धक्क्याने आजूबाजूच्या घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि आग कारच्या शोरूमसह इतर दोन इमारतींमध्ये पसरली.