Dombivali Shocker: डोंबिवली मध्ये पोलिसांच्या सतर्कतेने दिल्लीच्या निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती टळली; 40 वर्षीय महिलेवर रिक्षाचालकाचा बलात्काराचा प्रयत्न

या पोलिसांनी महिलेला रिक्षातून ढकललं जात असल्याचं पाहिलं होतं.

Auto Driver (Photo Credit: Twitter/ @IANS)

डोंबिवली मध्ये एका रिक्षाचालकासह त्याच्या सहकार्‍यांना अटक करण्यात आली आहे. त्याच्या रिक्षातील 40 वर्षीय महिला प्रवाशाचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्याचा तो प्रयत्न करत होता. स्क्रू ड्रायव्हरच्या धाकावर त्याने तिला मारण्याची धमकी देखील दिली होती. दरम्यान पेट्रोलिंग करणार्‍या दोन पोलिसांच्या प्रसंगावधानतेमुळे महिलेला मदत मिळली. या पोलिसांनी महिलेला रिक्षातून ढकललं जात असल्याचं पाहिलं होतं.

मानपाडा पोलिस स्टेशन मधील ऑफिसर कडून इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, 'दिल्लीच्या निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती मुंबई मध्ये टाळण्याचं काम पोलिसांनी केलं आहे.' ही घटना शुक्रवारी रात्री 10.45 ची आहे. महिला खिड कलेश्वर मंदिराला भेट देऊन घरी परतत होती. रिक्षामध्ये प्रवासी होते पण अशा परिस्थितीतही ती रिक्षामध्ये चढली. खिडकली बस स्टॉप ते कोल्हेगाव नाका दरम्यान ती प्रवास करत होती.

'कोल्हेगावला जेव्हा ती उतरत होती तेव्हा 22 वर्षीय रिक्षाचालक प्रभाकर पाटील आणि रिक्षातील त्याचे मित्र जे सहप्रवासी म्हणून होते त्यांनी रिक्षा Maay City area भागात वळवली. दोन आरोपींनी महिलेला धमकावलं.स्क्रू ड्रायव्हरच्या धाकावर तिला कपडे उतरवण्यास सांगितले. 30 मिनिटांच्या रिक्षा प्रवासामध्ये तिला दोघांनी छेडण्याचाही प्रयत्न केला. ' असं मनपाडा पोलिस स्टेशनचे इन्सपेक्टर राम चोपडा म्हणाले.

रिक्षामध्ये असताना महिला हात बाहेर काढत मदत मागण्याचा प्रयत्न करत होती पण सहप्रवासी तिला रोखत होते. परंतू सुदैवाने ऑन ड्युटी असलेल्या अतुल भोईये आणि सुधीर हसे या पेट्रोलिंग पोलिसांनी तिचा हात पाहिला होता त्यांनी रिक्षाचा पाठलाग सुरू केला.

पोलिस पाठलाग करत आहे हे पाहताच रिक्षा चालकाने वेग वाढवला आणि विवस्त्र अवस्थेत महिलेला बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला. तिच्या मनगटाला काही जखमा आहेत.

पोलिसांना आरोपींना पकडण्यात यश आलं एकाने पोलिसांवरही स्क्रू ड्रायव्हरने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतू त्याने तो परतावून लावला. दोन आरोपींवर यापूर्वी देखील 3 क्रिमिनल केसेस आहेत. यामध्ये चोरीचे गुन्हे आहेत. आरोपींवर आता पोलिसांनी कलम 366, 365, 354, 354 (a)(b), 332, 337, 506 (2), 323, आणि 34 अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif