डोंबिवली: एमआयडीसी मध्ये रस्ते झाले गुलाबी, डोळे चुरचुरत असल्याच्या नागरिकांकडून तक्रारी
देशभरात प्रदुषणाचा स्तर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तर देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओखळल्या जाणाऱ्या मुंबईत प्रदुषणामुळे हवेचा दर्जा खालावला जात असल्याची बाब समोर आली होती.
देशभरात प्रदुषणाचा स्तर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तर देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओखळल्या जाणाऱ्या मुंबईत प्रदुषणामुळे हवेचा दर्जा खालावला जात असल्याची बाब समोर आली होती. तर ग्रीनपीस इंडिया यांच्या अहवालामध्ये महाराष्ट्रातील मुंबई हे सर्वात प्रदुषित शहर असल्याचे समोर आले होते. याच पार्श्वभुमीवर पावसाळ्याच्या दिवसात डोंबिवली येथील परिसरात रासायनिक कंपन्या असल्याने त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. पावसाळ्याच्या दिवसात डोंबिवलीत कधी ऑरेंज पाऊस तर कधी हिरवा पाऊस पडल्याचे दिसून आले होते.
सध्या डोंबिवली मधील रस्ते गुलाबी रंगाचे दिसुन येत आहेत. याच परिस्थितीत एमआयडीसी मधील रस्त्यांवर केमिकल परसल्याने ते गुलाबी रंगाचे झाले आहेत. एवढेच नाही तर नागरिकांना याचा त्रास होत असून डोळे चुरचुरत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. नागरिकांनी या प्रकरणी पर्यावरण विभागकडे बोट दाखवले आहे. तर डोंबिवलीच्या प्रदुषणावर कधी नियंत्रण आणणार याची चिंता आता स्थानिकांना सातावू लागली आहे.(डोंबिवली: कोपर रेल्वे स्थानकात TC ला मारहाण करणारा प्रवासी अटकेत)
(The above story first appeared on LatestLY on Feb 05, 2020 04:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

