Dog VS Cat Wrestling: कुत्र्यासोबत मांजर खेळे, दोघांची शेपटी जमिनीवर लोळे, युजर्स म्हणाले 'व्वा!'

सोशल मीडियावरही (Social Media) अनेकांकडून या व्हिडिओचे कौतुक झाले आहे.

Dog VS Cat Wrestling | PC: Facebook

कुत्रा (Dog), मांजर (Cat) अशा प्राण्यांवर प्रेम करणाऱ्या अनेक मंडळींना कदाचित हा व्हिडिओ (Video) पाहायला आवडेल. सोशल मीडियावरही (Social Media) अनेकांकडून या व्हिडिओचे कौतुक झाले आहे. हा व्हिडिओ आहे कुत्रा आणि मांजर यांच्यातील कुस्तीचा. अर्थात याला कुस्ती म्हणता येईल किंवा नाही याबाबत अनेकांचे दुमत असू शकते खरे. पण, आपल्या सोईसाठी इथे कुस्ती असा शब्द वापरला आहे. खरेतर कुत्रा आणि मांजर यांच्यात फारसे सख्य पाहायला मिळत नाही. पण, या व्हिडिओत मात्र दोघेही एकत्र खेळताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे कुत्र्या मांजरातील शत्रुत्वाप्रमाणे तुम्हाला कधी कधी दोस्तीही पाहायला मिळू शकते.

इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 6.5 मिलियन पेक्षाही अनेक लोकांनी पाहिला आहे. अनेकांनी शेअर केला आहे. लाईक आणि कॉमेंट्सचा तर या व्हिडिओवर पाऊस पडला आहे. एका इन्स्टाग्राम युजर्सने प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, 'परफेक्ट' तर दुसऱ्याने म्हटले आहे 'खुपच सुंदर'. व्हिडिओ शेअर करताना युजरने म्हटले आहे की, या दोघांना मॅटवर घेऊन जा. दोघेही छान कुस्ती खेळतील. (हेही वाचा, Dog Riding Horse: कुत्र्याची घोडेस्वारी, High Jump पाहून सोशल मीडियावर युजर्सनाही वाटले कौतुक (Funny Video Of Animal))

 

View this post on Instagram

 

A post shared by Instagram (@instagram)

व्हिडिओत आपण पाहू शकता की, मांजर आणि कुत्रा दोन्ही एकमेकांसोबत कुस्त खेळत आहेत. मांजर वारंवार कुत्र्यावर चाल करत आहे. त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, कुत्रा आजिबात न चिडता त्या मांजराशी अत्यंत प्रेमाणे खेळत आहे. जे पाहून आपल्यालाही त्या दोघांच्या दोस्तीचा पक्का अंदाज येतो.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif