धक्कादायक! 'डॉक्टर डेथ' सातारा पोलिसांच्या ताब्यात; 22 महिलांच्या खुनाचा आरोप, 6 सिद्ध
त्याने अनेक स्त्रियांना जिवंत दफन केले आहे आणि याची कोणाला कानोकान खबर देखील लागली नाही. संतोष पोळ (Santosh Pol) असे या डॉक्टरचे नाव आहे
डॉक्टर डेथ (Doctor Death)... जनता आणि माध्यमांनी हेच नाव या विक्षिप्त डॉक्टरला दिले आहे. सहसा डॉक्टर लोकांची सेवा करतात, त्यांच्यावर उपचार करतात आणि मृत्यूपासून त्यांना वाचवतात. परंतु सातारा (Satara) येथील हा डॉक्टर स्वत: लोकांसाठी मृत्यू बनला आहे. त्याने अनेक स्त्रियांना जिवंत दफन केले आहे आणि याची कोणाला कानोकान खबर देखील लागली नाही. संतोष पोळ (Santosh Pol) असे या डॉक्टरचे नाव आहे.
त्याने आतापर्यंत तब्बल 22 खून केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. मात्र त्यातील पाच महिला आणि एका पुरुषासह सहा खुनांचा आरोप सिद्ध झाला आहे. संतोष हा सातारा जिल्ह्यात राहत असून तो जवळच्याच हॉस्पिटलमध्ये काम करत होते.
2016 मध्ये त्याला मुंबईच्या दादर येथून अटक करण्यात आली होती. अटकेनंतर चौकशीदरम्यान त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले, जे ऐकून पोलिसही आश्चर्यचकित झाले. साताऱ्यातील 49 वर्षीय अंगणवाडी शिक्षिका मंगला जेधे या अचानक गायब झाल्या. यामध्ये डॉ. पोळ याचा सहभाग असल्याची शंका तिच्या कुटुंबियांनी व्यक्त केली. दबाव वाढल्यावर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावले. मात्र पुराव्याअभावी त्याला सोडण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी मंगला जेधेच्या मोबाईल लोकेशनची तपासणी केली असता, तिचा मोबाइल ज्योती मांद्रे नावाच्या नर्सकडे असल्याचे समजले. ज्योती डॉक्टर संतोष पोळ याच्याकडे काम करायची. यानंतर पोलिसांनी ज्योतीला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावले. चौकशी दरम्यान ज्योतीने, पोळ याने मंगला जेधेची हत्या करून तिला फार्महाऊसमध्ये पुरल्याचे सांगितले.
त्यानंतर पोलिसांनी तपासणी करून पुरलेल्या जागेवरून ज्योतीचा मृतदेह बाहेर काढला. ज्या ठिकाणी ज्योतीचा मृतदेह पुरला होता त्याठिकाणी नारळाचे झाड लावण्यात आले होते. या प्रकरणाबाबत 11 ऑगस्टला संतोष याला अटक करण्यात आली. पुढच्या चौकशीत संतोष याने 6 खून केले असल्याचे मान्य केले. त्याने पहिला खून 2003 साली केला होता. आपल्या क्लिनिकमध्ये उपचारासाठी आलेल्या पेशंट्सला संतोष इंजेक्शन देऊन बेशुद्ध करत असे. नंतर त्यांना आपल्या फार्महाउस मध्ये पुरात असे. अशाप्रकारे पोलिसांना आतापर्यंत 5 सांगाडे सापडले, पुरुषाच्या मृतदेहाच्या शोध लागला नाही. (हेही वाचा: बलात्कार आणि खून प्रकरणी तब्बल 12 वर्षानंतर होणार पीडितेच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम; 8 वर्ष तुरुंगवासानंतर निर्दोष सुटला होता आरोपी)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2003 ते 2006 या कालावधीमध्ये आणखी 15 जण गायब झाले आहेत. पोलिसांना संशय आहे की संतोषनेच त्यांना गायब केले असावे. याबाबत पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे. सध्या संतोष आणि त्याच्या क्लिनिकमध्ये काम करणारी नर्स पोलीस कोठडीत आहेत.