Diwali Laxmi Pujan 2020: दिवाळीच्या निमित्ताने राजेश टोपे, देवेंद्र फडणवीस, रोहित पवार अशा नेत्यांनी सपत्निक केली लक्ष्मीपूजा (See Photo)

या उत्सवादरम्यान तब्बल 5 वेगवेगळे दिवस मोठ्या भक्तिभावाने साजरे होतात. आज या दिवाळीतील सर्वात महत्वाचा दिवस, लक्ष्मीपूजा (Laxmi Puja) साजरी होत आहे.

देवेंद्र फडणवीस व रोहित पवार (Photo Credit : Twitter)

भारतामध्ये सध्या दिवाळीचा (Diwali 2020) सण साजरा होत आहे. या उत्सवादरम्यान तब्बल 5 वेगवेगळे दिवस मोठ्या भक्तिभावाने साजरे होतात. आज या दिवाळीतील सर्वात महत्वाचा दिवस, लक्ष्मीपूजा (Laxmi Puja) साजरी होत आहे. भारतामध्ये सर्वत्र हा दिवस मोठ्या भक्तिभावाने  लक्ष्मी पूजा करत साजरा होत आहे. महाराष्ट्रामध्येही आज संध्याकाळी घराघरांमध्ये लक्ष्मीपूजा पार पडली. राजकारणी नेते राजेश टोपे (Rajesh Tope), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सपत्नीक लक्ष्मीची पूजा केली. या पूजेचे फोटो त्यांनी सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

रोहित पवार यांनी, ‘बारामती ऍग्रो कंपनी'त परंपरेप्रमाणे गृहलक्ष्मी सौ. कुंती व इतर कर्मचाऱ्यांसमवेत लक्ष्मीपूजन केले. घरी आई (सुनंदाताई) आणि बाबांनी (राजेंद्र दादा) नेहमीप्रमाणे मनोभावे लक्ष्मीपूजन करुन ही दिवाळी सर्वांसाठी आनंदाची, नवचैतन्याची आणि आरोग्यदायी जावो, अशी प्रार्थना केली.

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी, आज पाथरवाला (बु.) येथे सपत्निक महालक्ष्मीचे पूजन केले. 'दूरितांचे तिमिर जावो' अंधकाराकडून तेजाकडे नेणारा, प्रकाशाची आराधना करणारा हा दीपोत्सव माझे शेतकरी बांधव यांना सुख समाधान घेऊन येवो, अशी प्रार्थना त्यांनी केली. तसेच कोरोना हा संसर्ग राज्यातून व देशातून लवकर हद्दपार होऊ दे, येणारी दिवाळी व नवीन वर्ष आपणा सर्वांसाठी सुख-समृध्द, उत्तम आरोग्य घेऊन येवो हे साकडेही घातले. (हेही वाचा: Diwali 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जेपी नड्डा, अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यासह 'या' नेत्यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा)

देवेंद्र फडणवीस यांनीही पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत, लक्ष्मीपूजन करून सर्वांच्या मांगल्याची कामना केली.

एकनाथ खडसे यांनी कोथळी येथे निवासस्थानी परिवारासमवेत दिवाळी साजरी केली

चित्रा वाघ यांनीही आपल्या कुटुंबांसोबत दिवाळी साजरी केली

दरम्यान, राष्ट्रीय पातळीवरीलही अनेक नेत्यांनी आपल्या आपल्या कुटुंबीयांसोबत लक्ष्मीपूजा करत दिवाळी साजरी केली. दरवर्षीप्रमाणे यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सैनिकांसोबत आपली दिवाळी (Diwali 2020) साजरी केली. यासाठी पंतप्रधान मोदी यावेळी जैसलमेर, लोंगेवाला पोस्टवर (Longewala Post) पोहोचले. येथे त्यांनी सैनिकांसह दिवाळी साजरी केली, त्यांना प्रोत्साहन दिले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif