Diwali 2022: शिर्डी साईबाबा चरणी 18 कोटी रुपयांचे दान; रोख रक्कम, ऑनलाईन देणगी, चेक, सोनं, चांदी, परकीय चलनाचा समावेश

शिर्डी साईबाबा (Shirdi Sai Baba) चरणी 20 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या 15 दिवसांत तब्बल 18 कोटी रुपयांचे दान मिळाले आहे. दिवाळी सण (Diwali 2022) आणि सणानिमित्त आलेल्या सुट्ट्यांमुळे अनेक भाविकांनी शिर्डी साईबाबा चरणी हजेरी लावली.

Shirdi Sai Baba | ((Photo Credit: sai.org)

शिर्डी साईबाबा (Shirdi Sai Baba) चरणी 20 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या 15 दिवसांत तब्बल 18 कोटी रुपयांचे दान मिळाले आहे. दिवाळी सण (Diwali 2022) आणि सणानिमित्त आलेल्या सुट्ट्यांमुळे अनेक भाविकांनी शिर्डी साईबाबा चरणी हजेरी लावली. या वेळी अनेकांनी भरभरुन दान केल्याचे दिसते. साई संस्थानच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 15 दिवसांमध्ये मिळालेल्या दानामध्ये रोख रक्कम, ऑनलाईन देणगी, चेक, सोनं, चांदी, परकीय चलन आदीचा समावेश आहे.

साईबाबा चरणी प्राप्त झालेले दान खालील प्रमाणे-

दक्षिणा पेटी: 3 कोटी 11 लाख 79 हजार 184 रुपये, देणगी काउंटर : 7 कोटी 54 लाख 45 हजार 408 रुपये ,ऑनलाईन देणगी : 1 कोटी 45 लाख 42 हजार 808 रुपये, चेक / डीडी देणगी : 3 कोटी 3 लाख 55 हजार 946 रुपये, मनीआर्डरद्वारे : 7 लाख 28 हजार 833 रुपये, डेबिट क्रेडिट कार्ड देणगी : 1 कोटी 84 लाख 22 हजार 426 रुपये, सोने : 860.450 ग्रॅम सोने ( 39.53 लाख 29रुपये ), चांदी : 13345. 970ग्रॅम ( 5.45 लाख रुपये ), परकीय चलन : 24.80 लाख रुपये (29 देशांचे).

केवळ दिवाळीच नव्हे यंदाचे सर्वच सण नेहमीपेक्षा काहीसे वेगळे होते. कोरोना महामारीतल दोन वर्षांचा प्रदीर्घ काळ गेल्यावर प्रथमच सण-उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे होते आहेत. यात दिवाळीचाही समावेश आहे. कोरोणा काळात सर्व सण उत्सव आणि मंदिरे बंद होती. त्यामुळे भाविकांना सण उत्सव आणि मंदिर दर्शन करण्यावर मर्यादा होत्या. आता कोरोना महामारीचा काळ संपला आहे. निर्बंधही हटविण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर आणि मोकळेपणाने सण उत्सव साजरे करताना दिसत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement