District Rain Forecast & Warnings: महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी; 3 व 4 जून रोजी मुंबई, ठाणेसह 'या' जिल्ह्यांना Red Alert जारी

फक्त मुंबईच (Mumbai) नाही तर, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळणार असून,

Image used for representational purpose only | (Photo Credits: PTI)

अरबी समुद्रात (Arabian Sea) कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने, जूनच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत मान्सून पूर्व पावसाचे (Rains) आगमन होत आहे. फक्त मुंबईच (Mumbai) नाही तर, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळणार असून, काही जिल्ह्यांना रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई म्हणजेच कुलाबा वेधशाळेने हा अंदाज वर्तवला आहे. यानुसार 1 जून ते 5 जून या काळात महाराष्ट्रात पाऊस होण्याची शक्यता आहे. येत्या 2 -3 दिवसात पश्चिम किनार पट्टीवर चक्रीवादळ धडकण्याची शक्यता रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवली होती. यासाठी नागरिकांसह यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

कुलाबा वेधशाळेच्या अनुमानानुसार,

रेड अलर्ट –

3 जून – पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, धुळे, नंदुरबार व नाशिक

4 जून – नंदुरबार, धुळे व पालघर

या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून, या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.

ऑरेंज अलर्ट –

1 जून – रत्नागिरी, सिंधुदुर्ग,

4 जून – नाशिक, रायगड, मुंबई व ठाणे

जिल्हानिहाय यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

दरम्यान, भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 'निसर्ग चक्रीवादळ' 3 जूनपर्यंत महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. पुढील 12 तासांत हे वादळ अरबी समुद्रात अजून खोल जाईल. पुढील 24 तासांत म्हणजे 2 जून रोजी हे चक्रीवादळ थोडे तीव्र होईल व 3 जून पर्यंत 'Severe Cyclonic Storm' मध्ये त्याचे रुपांतर होईल. (हेही वाचा: अरबी समुद्रात 'निसर्ग' चक्रीवादळाचे सावट; महाराष्ट्रात बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या 9 तुकड्या तैनात)

यासोबतच महाराष्ट्रात 8 जूनपर्यंत मान्सूनचे आगमन झाल्यानंतर, मुंबईत 11 जून पर्यंत मान्सूनच्या सारी बरसतील, असा अंदाज मुंबई हवामान खात्याने वर्तवला आहे.