Dhule Accident: मुंबई आग्रा महामार्गावर ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघातात 20 प्रवाशी जखमी, दोन जण गंभीर

पुण्याहून उत्तरप्रदेशकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचा मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवरील नरडाणा गावापासून काही अंतरावर तोल गेल्याने अपघात झाल्याची घटना आज घडली.

Crime (PC- File Image)

नाशिकसह (Nashik) विभागात अपघाताचे सत्र सुरूच असून सातत्याने होणाऱ्या अपघातामुळे (Accident) अनेकांना प्राणाला मुकावे लागत असल्याचे चित्र आहे. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai Agra Highway) 70 पेक्षा जास्त प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल्स (Travels Bus) तोल गेल्याने उलटल्याची घटना घडली. सुदैवाने यात जिवीतहानी टळली असून एका चार वर्षीय मुलीच्या हाताला जबर दुखापत झाल्याची घटना घडल्याची देखील माहिती आहे. तर तब्बल वीसहून अधिक प्रवाशी जखमी झाले आहेत. (हेही वाचा - Maharashtra Politics: सुप्रिम कोर्ट चिडले, राहुल नार्वेकर यांना झापले; आमदार अपात्रता प्रकरणातील कामावरही ताशेरे)

पुण्याहून उत्तरप्रदेशकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचा मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवरील नरडाणा गावापासून काही अंतरावर तोल गेल्याने अपघात झाल्याची घटना आज घडली. या ट्रॅव्हल्समध्ये 70 पेक्षा जास्त प्रवासी असल्याची माहिती मिळाली असुन या घटनेत वीस प्रवासी जखमी झाले असून दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी पोलीसांसह स्थानिक नागरिकांनी धाव घेत मदतकार्य सुरु केले असून जखमी झालेल्या प्रवासांना धुळे जिल्हा रुग्णालय येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

घटनास्थळी महामार्ग पोलीसांकडून देखील मदतकार्य सुरु आहे. ट्रॅव्हल्समधून प्रवास करत असलेल्या प्रवाशांचे सामान मोठ्या प्रमाणावर ट्रॅव्हल्सवर असल्याने एका वळणावर तोल गेल्याचे प्राथमिक माहिती आहे. जेव्हा ट्रॅव्हल्स उलटली तेव्हा मार्गावर वर्दळ नसल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र ट्रॅव्हल्स उलटल्याने ट्रॅव्हल्समधील प्रवाशांची मोठी आरडाओरड झाली.