Devendra Fadnavis On Rahul Gandhi: 'धूळ तुमच्या चेहऱ्यावर होती अन् तुम्ही आरसा साफ करत राहिलात'; देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर टीका
राहुल गांधी यांनी नेहमी एक चूक केली. धूळ त्यांच्या चेहऱ्यावर होती आणि ते आरसा साफ करत राहिले, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
Devendra Fadnavis On Rahul Gandhi: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी रविवारी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारतीय निवडणूक आयोगावर (ECI) केलेल्या आरोपांवरून निशाणा साधला. राहुल गांधी यांनी नेहमी एक चूक केली. धूळ त्यांच्या चेहऱ्यावर होती आणि ते आरसा साफ करत राहिले, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. शनिवारी राष्ट्रीय जनता दल (RJD) नेते तेजस्वी यादव यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय निवडणूक आयोगावर (ECI) केलेल्या आरोपांचे जोरदार समर्थन केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजवटीत भाजपने संवैधानिक संस्थांचे अपहरण केल्याचा आरोप केला.
रविवारी पत्रकारांशी बोलताना तेजस्वी याजव म्हणाले की, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून सर्व संवैधानिक संस्थांचे अपहरण झाले आहे. निवडणूक आयोग निवडणुकीची घोषणा करण्यापूर्वी, भाजप आयटी सेलला वेळापत्रक माहित आहे. आमचे सर्व गोष्टींवर लक्ष आहे. संवैधानिक संस्थांनी त्यांचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले पाहिजे. प्रत्येकाने सतर्क राहण्याची गरज आहे. सर्वांना माहिती आहे की सर्व संस्था भाजपचे प्रतिनिधि म्हणून काम करतात. (हेही वाचा - CM Devendra Fadnavis On Rahul Gandhi: 'याचा अर्थ राहुल गांधींनी बिहारमध्ये आपला पराभव स्वीकारला आहे...', महाराष्ट्र निवडणूक हेराफेरीच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया)
दरम्यान, राहुल गांधी यांनी महाराष्ट्रासह सर्व राज्यांच्या लोकसभा आणि विधानसभांच्या अलिकडच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाला एकत्रित, डिजिटल, मशीन-रीडेबल मतदार याद्या प्रकाशित करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आता राहुल गांधीवर अनेक भाजप नेत्यांनी टिकेची झोड उठवली आहे. शनिवारी, X वरील एका पोस्टमध्ये, राहुल गांधी यांनी महाराष्ट्र निवडणुकीबद्दलच्या त्यांच्या आरोपांना निवडणूक आयोगाच्या प्रतिसादाचा उल्लेख केला आणि म्हटले की, 'मध्यस्थांना स्वाक्षरी नसलेल्या, टाळाटाळ करणाऱ्या नोट्स देणे हा गंभीर प्रश्नांना उत्तर देण्याचा मार्ग नाही.' त्यावर उत्तर देताना, निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र निवडणुकीतील गैरप्रकारांना अप्रमाणित आरोप असल्याचं म्हटलं होतं. (वाचा - ECI on Rahul Gandhi's Maharashtra Poll Remarks: 'महाराष्ट्रातील निवडणुकीवर केलेले आरोप निराधार व राज्याचा अपमान करणारे'; राहुल गांधींच्या टिप्पणीवर Election Commission ची प्रतिक्रिया)
फडणवीस यांची राहुल गांधींवर टीका -
"ताउम्र राहुल गांधी यहीं गलती करते रहें, धूल चेहरे पर थी और आईना पोछते रहें..."
(📍पुणे | 8-6-2025)@RahulGandhi#Maharashtra #Pune #MaharashtraElection2024 pic.twitter.com/qSEhItM2Ya
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 8, 2025
तथापि, निवडणूक आयोगाने म्हटलं आहे की, 'कोणाकडूनही पसरवण्यात येणारी कोणतीही चुकीची माहिती केवळ कायद्याचा अनादर करण्याचे लक्षण नाही तर त्यांच्या राजकीय पक्षाने नियुक्त केलेल्या हजारो प्रतिनिधींची बदनामी आहे. ही चुकीची माहिती निवडणुकीदरम्यान अथक आणि पारदर्शकपणे काम करणाऱ्या लाखो निवडणूक कर्मचाऱ्यांना निराश करते. मतदारांनी दिलेल्या कोणत्याही प्रतिकूल निकालानंतर, निवडणूक आयोगाशी तडजोड केली आहे असे सांगून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करणे पूर्णपणे मूर्खपणाचे आहे,' असेही आयोगाने स्पष्ट केलं आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 15, 9663 05:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

