राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार धनराज महाले शिवबंधनात अडकले, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांनी पक्षाची साथ सोडत सत्ताधारी भाजप अथवा शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. यात शिवेंद्रराजे भोसले (Shivendrasinh Raje Bhosale),संदीप नाईक (Sandeep Naik), वैभव पिचड (Vaibhav Pichad) यांचा समावेश आहे. या नेत्यांचा नुकताच भाजप आणि शिसेना पक्षात प्रवेश झाला आहे. या यादीत आता धनराज महालेय यांचाही समावेश झाला आहे.

Dhanraj Mahale joins Shiv Sena Party | (Photo Credit: Twitter)

Maharashtra Vidhan Sabha Election 2019:  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिंडोरी (Dindori) विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार धनराज महाले (Dhanaraj Mahale) यांनी घड्याळाला सोडचिठ्ठी देत शिवसेना (Shiv Sene)  पक्षाचा भगवा खांद्यावर घेतला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत धनराज महाले यांनी शिवसेनेत शुक्रवारी (16 ऑगस्ट 20198) प्रवेश केला आणि ते शिवबंधनात अडकले. महाले यांच्या शिवसेना पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणखी एक मोहरा सत्ताधारी पक्षाच्या गळाला लागला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांनी पक्षाची साथ सोडत सत्ताधारी भाजप अथवा शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. यात  शिवेंद्रराजे भोसले (Shivendrasinh Raje Bhosale),संदीप नाईक (Sandeep Naik), वैभव पिचड (Vaibhav Pichad) यांचा समावेश आहे. या नेत्यांचा नुकताच भाजप आणि शिसेना पक्षात प्रवेश झाला आहे. या यादीत आता धनराज महालेय यांचाही समावेश झाला आहे.

दरम्यान, धनराज महाले यांचा हा पक्षप्रवेश नव्हे तर, घरवापसी असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांचे आणि जुन्या शिवसैनिकांचे म्हणने आहे. याचे कारण म्हणजे धनराज महाले हे मूळचे शिवसैनिकच होते. मात्र,  त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. शिवसेना पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीने धनराज महाले यांना दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरवले होते. मात्र, भाजप उमेदवार डॉ. भारती पवार यांनी त्यांचा पराभव केला. विशेष असे की, डॉ. भारती पवार याही मूळच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्याच. परंतू, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्या भारतीय जनता पक्षात प्रवेशकर्त्या झाल्या. भाजपने त्यांना दिंडोरी लोकसभा मतदारसंघात उतरवले. त्यांनी महालेय यांचा पराभव करत विजय मिळवला. (हेही वाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा धक्का, दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले भगव्याच्या वाटेवर; उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार शिवसेना प्रवेश)

धनराज महाले यांचा परिचय पाहायचा तर ते समाजवादी नेते आणि माजी खासदार दिवंगत हरीभाऊ महाले यांचे चिरंजीव आहेत. शिवसेनेच्या तिकीटावर ते 2009 मध्ये दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. परंतू, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारवा लागला. दरम्यान, लोकसभा निवडणूक 2019 मध्ये त्यांनी मैदानात उतरविण्याचे ठरवले. मात्र, शिवसेना-भाजप यूतीच्या जागावाटपात त्यांचा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला. त्यामुळे त्यांनी हातावरचे शिवबंधन काढत राष्ट्रवादीचे घड्याळ हाती घेतले. पण, त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now