Amruta Fadnavis Slams Bhai Jagtap: अमृता फडणवीस आक्रमक; एकेरी उल्लेख करत भाई जगताप यांना दिला 'हा' इशारा

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी पोलिसांच्या बँक खात्यावरून भाजपवर टीका केली होती.

Amruta Fadnavis, Bhai Jagtap (Photo Credit: FB)

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून राज्यातील सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी पोलिसांच्या बँक खात्यावरून भाजपवर टीका केली होती. भाजप सत्तेत असताना राज्यातील पोलिसांची खाती देवेंद्र फडवीस यांनी स्वतःच्या बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली? असा सवाल भाई जगताप उपस्थित केला होता. यावर अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी आक्रमक भूमिका घेत भाई जगताप यांना ट्विटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. विशेष म्हणजे, या ट्विटमध्ये अमृता यांनी जगताप यांचा एकेरी उल्लेख केल्याने हे ट्विट अधिक चर्चेत आले आहे.

ए भाई , तू जो कोण असशील माझ्या वर बोट उचलायचे नाही. पोलिसांची खाती तुमच्याच राज्यात तुम्ही ‘यूटीआय बॅंक / एक्सिस बॅंकला योग्यता पाहून दिली होती. लक्षात ठेव, सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवसायचे नाही, अशा आशयाचे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे. हे देखील वाचा- महाराष्ट्र पोलिस महासंचालक पदी नियुक्त Rajnish Sheth यांच्या बदलीला आव्हान देण्यासाठी IPS Sanjay Pandey बॉम्बे हाय कोर्टात धाव घेणार

अमृता फडणवीस यांचे ट्वीट-

नुकताच भाई जगताप यांनी एबीपी माझाशी संवाद साधला होता. त्यावेळी ते म्हणाले होते की, माझा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सवाल आहे की त्यांनी सत्तेत असताना राज्यातील पोलिसांची खाती स्वतःच्या बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली याचे उत्तर द्यावे. फडणवीस यांनी तब्बल 21 जणांना त्यांच्या काळात भ्रष्टाचाराच्या आरोपातून क्लीनचिट दिली आहे. त्यामुळे त्यांच्या बाबत काय बोलणार? असे देखील भाई जगताप यांनी म्हटले आहे.