केवळ 80 तासांत कोसळले देवेंद्र फडणवीस यांचे सरकार; सर्वाधिक कमी काळ पदावर असलेले ठरले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर काहीक्षणातच देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे सोपावला असून केवळ 80 तास मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार संभळणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अनेक हालचाली पाहायला मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर काहीक्षणातच देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे सोपावला असून केवळ 80 तास मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार संभळणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. या निवडणुकीत भाजप- शिवसेना पक्षाला जनतेने कौल दिला असूनही मुख्यमंत्रीपदावरुन महायुतीत वाद निर्माण झाला होता. त्यानंतर राज्यात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे सरकार येणार असे वाटत असताना शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करत स्वता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला होता. त्यानंतर राज्यपालांनी 30 नोव्हेंबरला भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी वेळ दिला होता.
महाराष्ट्रातील राजकारणात धक्कादायक घटना घडत असून देवेंद्र फडणीवीस यांच्या राजीनाम्यानंतर सर्वत्र मुख्यमंत्रीपदाची चर्चा रंगली आहे. देवेंद्र फडणीवीस यांच्या नावावर सर्वात कमी वेळात राजीनामा देण्याचा लाजिरवाणा विक्रमाची नोंद झाली आहे.
एएनआयचे ट्वीट-
दरम्यान, यापूर्वी मारोतराव कन्नमवार हे महाराष्ट्राचे केवळ 9 दिवस मुख्यमंत्री होते. परंतु, ते काळजीवाहू मुख्यमंत्री होते. यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस हे एकमेव मुख्यमंत्री आहेत. ज्यांनी केवळ 3 दिवसांतच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. सध्या भारतीय जनता पक्षात सक्रिय असलेले नेते नारायण राणे यांनीही 258 दिवसांसाठी मुख्यमंत्री पदाचा कार्यकार संभाळला होता.