Devendra Fadnavis On Eknath Khadse: 'मी घरची धुणी रस्त्यावर कधीच धुत नाही' भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर
भारतीय जनता पक्षाचे (BJP) जेष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यातील आरोप प्रत्यारोपाच्या फैरी येत्या काही दिवासात वाढण्याची चिन्हे आहेत. माझ्यात खूप संयम आहे. 'मी घरची धुणी रस्त्यावर कधीच धुत नाही', असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांना लगावला आहे. एकनाथ खडसे यांनी फडणवीस यांच्यावर कालच (10 सप्टेंबर) पुन्हा एकदा थेट टीका केली होती. या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी आज (11 सप्टेंबर) प्रत्युत्तर (Devendra Fadnavis responds to BJP senior leader Eknath Khadse) दिले आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
एकनाथ खडसे यांच्या आरोपांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, मी अद्यापही संयम बाळगून आहे. घरची धुणी मी रस्त्यांवर कधीच धुत नाही. एकनाथ खडसे हे आमच्या पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्यावर मी टीका, टीप्पणी करणार नाही. परंतू, ते ज्या मनीष भंगाळे प्रकरणावरुन बोलतात त्याबाबत मी एक नक्की सांगतो की, खडसे यांना त्या प्रकरणावरुन राजीनामा द्यावा लागला नाही. (हेही वाचा, Eknath Khadse On Devendra Fadnavis: 'आमचा मुख्यमंत्री ड्राय क्लिनर होते' भाजप नेते एकनाथ खडसे यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र)
पुढे बोलता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वास्तवात भंगाळे याने आरोप केल्यानंतर मी स्वत: एक कमिटी तयार केली. या कमिटीला 12 तासात अहवाल द्यायला सांगितला. त्यानंतर बारा तासातच त्यांना क्लिन चिट मिळाली. या क्लिन चिटलाही ते जर ड्राय क्लिनर म्हणत असतील तर त्याबाबत मला माहिती नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मनीष भंगाळे याला अटक झाली होती. तो काही काळ तुरुंगातही होता. दरम्यान एमआयडीसी प्रकरणात खडसे यांनी स्वत: बैठका घेऊन निधी देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला. या आरोपांमुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला, असेही देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी सांगितले. (हेही वाचा, Eknath Khadse On BJP Leadership: बहुजनांना डावलण्याच्या नेतृत्वाच्या वृत्तीमुळे भाजपची सत्ता गेली- एकनाथ खडसे)
एकनाथ खडसे यांनी काय म्हणाले होते?
एकनाथ खडसे यांनी म्हटले होते की, आमचा मुख्यमंत्री ड्राय क्लिनर होते. आरोप झाला की क्लिनचिट द्यायचे. पण नाथाभाऊंना दिली नाही. माझ्यावर एवढा राग का?. नाथाभाऊ हा अन्याय सहन करणाऱ्यांपैकी मुळीच नाही. जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही. तोपर्यंत आपण स्वस्त बसणार नाही. आपण पक्षाच्या विरोधात बोलणार नाही. परंतू, न्याय मिळेपर्यंत पक्षाला प्रश्न विचारत राहणार. (हेही वाचा, 'मी पुन्हा येईन हे जनतेला आवडले की नाही? याचा शोध घेईन' असे म्हणत भाजप नेते एकनाथ खडसे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला)
आपल्यावर झालेल्या अन्यायाबद्दल आपण ‘नानाजी फडणवीसाचं बारभाई कारस्थान’ हे पुस्तक लवकरच लिहिणार आहोत, अशी घोषणाही एकनाथ खडसे यांनी या कार्यक्रमात केली. चार-दोन राजे लाचार झाले आणि इंग्रजांना मिळाले तसाच हा कार्यक्रम आहे. माझ्यावर दाऊदशी संबंध असलेल्याचे आरोप करणाऱ्या मनीष भंगाळे याला सन्मानाची वागणूक मिळते. आपल्याकडे याबाबतचे पुरावे आले आहेत. या पुस्तकात आपण हे सगळे लिहिणार आहोत, असेही खडसे यांनी म्हटले आहे.
एकनाथ खडसे यांच्या जीवनावर आधारीत सुनील नेवे लिखित पुस्तकाचे खडसे यांच्या हस्ते प्रकाश झाले. या प्रकाशन कार्यक्रमात एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. खडसे यांनी काल केलेल्या टीकेला फडणवीस यांनी आज उत्तर दिले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)