Raj Thackeray यांच्या अयोध्येला जाण्याच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देत केली 'ही' मोठी घोषणा
ते अहमदनगरमध्ये बोलत होते.
अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीच्या मंदिर (Ayodhya Ram Mandir) उभारणीसाठी सध्या निधी जमा करण्याचा अभियान सुरु आहेत. दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) हे येत्या 1 मार्च ते 9 मार्चदरम्यान अयोध्येला जाणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली. यावर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विचारले असता "राज ठाकरे अयोध्येला जात आहेत ही चांगली गोष्ट आहे" असे सांगून आपणही अयोध्या दौ-यावर जाणार असल्याची घोषणा केली आहे. ते अहमदनगरमध्ये बोलत होते.
TV9 ने दिलेल्या वृत्तानुसार, पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना राज ठाकरे यांच्या अयोध्या दौ-यावर बाबत विचारले असता, "राज ठाकरे यांचा अयोध्येला जाण्याचा निर्णय चांगला आहे. सगळ्यांनीच अयोध्येला गेलं पाहिजे, मी देखील जाणार आहे," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.हेदेखील वाचा- Raj Thackeray 1-9 मार्च दरम्यान एकदिवसीय अयोद्धा दौर्यावर, आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचा प्लॅन तयार
तसेच स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरीजी महाराज यांना एक लाख एक रुपयांचा धनादेश दिला.
दरम्यान काल (28 जानेवारी) सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे हे देशातील शेतक-यांच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसणार अशी घोषणा केल्यानंतर आपण स्वत: ला राळेगणसिद्धीला अण्णा हजारे यांना भेटण्यास गेले आहेत. "अण्णांशी गेल्या आठवड्यापासून आमची चर्चा सुरु आहे. आजच्या बैठकीत काही मार्ग निघेल असं आम्हाला वाटतंय. त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टींवर निर्णय देखील घेण्यात आले आहेत. त्यांनी उपोषणाला बसावं असं कोणालाच वाटत नाही"असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अण्णा हजारे यांनी सरकारला लिहिलेल्या या पत्रकात, "वारंवार आम्ही सरकारकडे आमच्या मागण्या मांडल्या आहेत. गेल्या तीन महिन्यांत पंतप्रधान आणि कृषी मंत्र्यांना मी पाच वेळा पत्र लिहिलं. सरकारचे प्रतिनिधी इथे येऊन चर्चा करत आहेत. मात्र, अद्याप या मागण्यांवर कोणताही योग्य तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे आता मी 30 जानेवारी 2021 रोजी महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथी दिनी राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात उपोषणाला बसणार आहे" असे म्हटले आहे.