Devendra Fadnavis On Vinayak Mete Accident: चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक केल्याने विनायक मेटेंचा अपघात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान सभेत निवेदन

मेटेंचे चालक (Driver) ओव्हरटेक (Overtake) करताना अपघात झाला, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पावसाळी अधिवेशनात म्हणाले आहेत.

Devendra Fadnavis | (File Photo)

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete)  यांचे कार अपघाती निधन (Accidental Death) झालं आहे. मेटे यांचा अकास्मात मृत्यू सगळ्याच्या मनाला चटका लावून गेला आहे. विनायक मेटेंच्या अपघाताची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरु आहे. तरी विरोधी पक्षासह शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांकडून वेगवेगळ्या शंका उपस्थित करण्यात येत आहे. आज विनायक मेटेंच्या अपघाताच्या मुद्दयाला हात घालत कॉंग्रेस आमदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) राज्यातील इतर मार्गावर होणाऱ्या अपघाताबाबत पावसाळी अधिवेशनात (Maharashtra Monsoon Session) मुद्दा उपस्थित केला. अनेक अपघात हे खड्यांमुळे होतं आहे. कोकणातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. माझा डोळ्यासमोर त्या दिवशी खड्यांमुळे अपघात झाला. याबाबत शासन काय निर्णय घेणार आहे, असा सवालही वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला.

 

वर्षा गायकवाड यांना  उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadanvis) यांनी म्हणाले की,  मेटेंचे चालक (Driver) ओव्हरटेक (Overtake) करताना अपघात झाला. चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करताना ही घटना घडली. मात्र गंभीर बाब म्हणजे मेटेंच्या चालकाने फोन केल्यानंतरही वेळेत मदत पोहचली नाही, असं म्हटलं गेलं आहे. मात्र चालकाने सांगितल्याप्रमाणे नवी मुंबई (Navi Mumbai) आणि रायगड (Raigad) पोलीस त्यांच्या रस्त्यात शोध घेत होते. पण अपघाताची लोकेशन (Location) कळू शकत नव्हती. त्यामुळे यंत्रणा बदलणं गरजेचं आहे. (हे ही वाचा:- OBC Reservations In Maharashtra Local Polls: 92 नगरपरिषदांसाठी ओबीसी आरक्षण प्रकरणी 5 आठवडे स्थिती जैसे थे ठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश)

तसेच ही यंत्रणा चुकीची असून यंत्रणा बदलणं गरजेचं असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं. अपघात (Accident) झाल्यानंतर थेट लोकेशन मिळणे सोपे होईल अशी यंत्रणा (Technology) उभी करण्यावर आम्ही भर देणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं आहे. याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज पावसाळी अधिवेशनात दिलेले आहे.