Devendra Fadnavis On Sanjay Raut: संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना ED ने नोटीस पाठवल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची दिली अशी प्रतिक्रिया
तसेच येत्या 29 डिसेंबरला त्यांची चौकशी केली जाणार आहे.
Devendra Fadnavis On Sanjay Raut: पीएमसी घोटाळ्याप्रकरणी (PMC Scam) शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस धाडली आहे. तसेच येत्या 29 डिसेंबरला त्यांची चौकशी केली जाणार आहे.यावरुन आता विरोधकांकडून संजय राऊत यांच्या पत्नीला नोटिस पाठवल्याने हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. याच दरम्यान आता भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस यांनी असे म्हटले की, संजय राऊत किंवा पत्नी वर्षा यांना ईडीने नोटिस पाठवल्याचे माहिती अद्याप मिळालेली नाही. तसेच कर नाही तर डर कशाला? असे ही त्यांनी पुढे म्हटले.
फडणवीस यांनी असे ही म्हटले की, संजय राऊत त्यांना कामात वेळ मिळाला तर बहुतांश वेळा शेरोशायरी ही करत ट्विट करतात. तर दुसऱ्या बाजूला ईडी त्यांची भुमिका बजावत आहे. याआधी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे आणि आता वर्षा राऊत यांना ईडीने नोटिस पाठवल्याने अधिक चर्चा होऊ लागली आहे. पण नोटिसा पाठवल्यानंतर केंद्र सरकार जाणीवपूर्वक विरोधकांच्या पाठीमागे ईडी चौकशी लावत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.(ED Notice To Sanjay Raut's wife: शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीकडून समन्स)
दरम्यान, वर्षा राऊत यांना ईडीने नोटिस पाठवल्यानंतर संजय राऊत यांनी एक ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांना आ देखे जरा किसमे कितना है दम जमके रखना कदम मेरे साथीया असे म्हटले आहे. तर ईडीच्या चौकशीनंतर हे ट्विट संजय राऊत यांनी केल्याचे म्हटले जात आहे. तर आता या प्रकरणी नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.