Devendra Fadnavis on Rahul Gandhi: 'मुंगेरीलालप्रमाणे राहुल गांधींनाही स्वप्न पाहण्याचा अधिकार'; इंडिया आघाडीच्या सरकार स्थापनाच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीस यांचा टोला
केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येणे अशक्य, मुंगेरीलालप्रमाणे राहुल गांधींनाही स्वप्न पाहण्याचा अधिकार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Devendra Fadnavis on Rahul Gandhi: केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होण्याच्या काँग्रेसच्या दाव्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधीं(Rahul Gandhi)ना टोला लगावला आहे. केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येणे अशक्य, मुंगेरीलालप्रमाणे राहुल गांधींनाही स्वप्न पाहण्याचा अधिकार असल्याचे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)म्हणाले. 4 जून नंतर केंद्रात भारतीय जनता पार्टीचेच सरकार स्थापन होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. वाराणसीमध्ये ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांना गंगापुत्र म्हणून संबोधित केले. (हेही वाचा:Rahul Gandhi on Pune Porsche Accident: '... तर त्यांना तुम्ही निबंध लिहायला का लावत नाही? ', पुण्यातील अपघातावरून राहुल गांधींचा टोला )
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मी लहान असताना 'मुंगेरी लाल के हसीन सपने' नावाची मालिका होती. 'मुंगेरीलालप्रमाणेच, राहुल गांधींनाही त्यांच्या स्वप्नात स्व:ताची भारताचे पंतप्रधान किंवा अगदी अमेरिकेचे राष्ट्रपती अशी कल्पना आहे. फडणवीस पुढे म्हणाले की, " देशाातील नागरिकांनी स्वतःसाठी 'गंगापुत्र मोदी' यांची निवड केली आहे.
वाराणसीमध्ये 1 जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मतदान पार पडत आहे. वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदी यांची लढत उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रमुख अजय राय यांच्यासोबत होणार आहे.