Sanjay Raut on Devendra Fadnavis: 'देवेंद्र फडणवीस हतबल, गुडघे टेकले', संजय राऊत यांची घणाघाती टीका

पण आम्हाला त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल माहिती आहे. मुख्यमंत्री असताना त्यांनी जो कणखरपणा दाखवला तो आता ते का दाखवत नाहीत? हा खरा प्रश्न आहे. राज्याचे गृहमंत्री म्हणून ते इतके दुबळे का झाले आहेत. ते हतबल आहेत. त्यांनी गुडघे टेकले आहेत, असे स्पष्ट दिसते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut, Devendra Fadnavis (PC - Facebook)

राज्यातील वाढती गुन्हेगारी, बिघडणारा सामाजिक सलोखा आणि सातत्याने राज्याच्या गृहमंत्रालयावर उपस्थित केले जाणारे प्रश्नचिन्ह यांवरुन शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. राज्याचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणीस हे अत्यंत अकार्यक्षम आहेत. खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमचे राजकीय मतभेद आहेत. पण आम्हाला त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल माहिती आहे. मुख्यमंत्री असताना त्यांनी जो कणखरपणा दाखवला तो आता ते का दाखवत नाहीत? हा खरा प्रश्न आहे. राज्याचे गृहमंत्री म्हणून ते इतके दुबळे का झाले आहेत. ते हतबल आहेत. त्यांनी गुडघे टेकले आहेत, असे स्पष्ट दिसते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊत यांनी आरोप केला की, राज्यातील सरकारला महाराष्ट्र अशांतच ठेवायचा आहे. भारतीय जनता पक्ष आज जरी वेगवेगळा मुखवटा घालून पुढे येत असेल. तरीसुद्धा आम्हाला माहिती आहे भारतीय जनता पक्षाच्या मनात काय असते. भाजपला पुढे करणाऱ्या पाठिमागच्या संघटना कोण आहेत. भाजपसोबत आम्ही 25 वर्षे राहिलो आहोत. त्यामुळे भाजप सत्ता मिळविण्यासाठी काय करत असते हे आम्हाला इतरांपेक्षा चांगले माहिती आहे. त्यामुळेच राज्यात असे अशांत वातावरण का आहे हे आम्ही सांगू शकतो. भाजपला मिंदे गटासबत आगामी निवडणुका जिंकायच्या आहेत. त्यामुळे या निवडणुका सरळ लोकशाही मार्गाने जिंकण्याची यांना खात्री नाही, त्यामुळेच राज्यात असे प्रकार सुरु असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले. (हेही वाचा, BJP On Shiv Sena: 'शिवसेना खासदार गद्दार, खोकेबहाद्दर', भाजप पदाधिकाऱ्याच्या आरोपाने युतीत तणाव, एकनाथ शिंदे गटात अस्वस्थता)

देवेंद्र फडणवीस हे कार्यक्षम व्यक्तीमत्व आहे. मनात आणलं तर ते हे सगळं थांबवू शकतात. पण, ते महाराष्ट्रातील अशांतता का दूर करत नाहीत? हा खरा प्रश्न आहे. खरं म्हणजे राज्यात, टीपू सुलतान, औरंगजेब यांचे पोष्टर लागतातच कसे. जे लोक लावतात त्यांच्यावर कारवाई का नाही होत? गृहमंत्री म्हणून फडणवीस इतके का हतबल झाले आहेत. महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. महिला, मुली यांच्या हत्या होत आहेत, असे असताना राज्याचा गृहविभाग कसली मजा बघत आहेत, असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे.