Devendra Fadnavis and Ambadas Danve: अंबादास दानवे यांचा इशारा, देवेंद्र फडवीस यांच्याकडून खुलासा; प्रसारमाध्यमांची तारांबळ
दानवे यांनी या चुकीच्या बातम्या चालविणाऱ्या वृत्तवाहिन्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा स्पष्ट ईशारा दिला. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही खुलासा केला. ज्यामुळे प्रसारमाध्यमांची चांगलीच तारांबळ उडाली.
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) च्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळांतून अफवांचे पीक चांगलेच वाढले आहे. हे पीक वाढविण्याच प्रसारमाध्यमे, खास करुन वृत्तवाहीण्या खतपाणी घालत आहेत. ज्याचा परिणामी राजकीय नेत्यांच्या विश्वासार्हतेवर होऊ लागला आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांनीच आता थेट प्रसारमाध्यमांना ईशारा देण्यास सुरुवात केली आहे. विधानपरिषदेचे विद्यमान विरोधी पक्षनेते आणि शिवसेना (UBT) पक्षाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांतून नुकत्याच झळकल्या. दानवे यांनी या बातम्यांचे पत्रकार परिषद घेऊन खंडण केले. तसेच, चुकीच्या बातम्या चालविणाऱ्या वृत्तवाहिन्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा स्पष्ट ईशारा दिला. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Lok Sabha Election 2024) यांनीही खुलासा केला. ज्यामुळे प्रसारमाध्यमांची चांगलीच तारांबळ उडाली.
प्रसारमाध्यमांवर कायदेशीर कारवाईचा ईशारा
अंबादास दानवे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितले की, मी बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक आहे. पाठिमागील 20 वर्षांपासून पक्षाचे काम करतो. चंद्रकांत खैरे आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाहीत. ते आमचे नेते आहेत. फक्त लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही दोघांनीही तिकीट मागितले होते. पक्षाने त्यांना ते दिले. त्या दिवशी एक दिवस नाराजी असते. दररोज नाराजी नसते. पण, प्रसारमाध्यमांनी उगाचच कारण नसताना दिशाभूल करणाऱ्या आणि असत्य बातम्या दाखवल्या. या बातम्या दाखविणाऱ्या प्रसारमाध्यमांवर मी मानहानीचा दावा दाखल करणार आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाईही करणार आहे, असा स्पष्ट ईशारा अंबादास दानवे यांनी दिला आहे. (हेही वाचा, Dr. Archana Patil Chakurkar: शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा डॉ. अर्चना यांचा भाजपमध्ये प्रवेश, लातूल जिल्हातील राजकीय समिकरणे बदलणार)
वृत्तवाहिण्यांची तारांबळ
अंबादास दानवे यांनी कारवाईचा ईशारा देताच प्रसारमाध्यमांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेक वृत्तवाहिन्यांनी आपल्याकडेही अंबादास दानवे यांच्या कथीत पक्षांतराची बातमी आली होती. मात्र, त्याची सत्यतात होऊ न शकल्याने आम्ही ती बातमी दिली नाही. आम्ही फक्त वास्तवावर आधारीतच बातम्या देत असतो, असे सांगणाऱ्याही बातम्या केल्या. धक्कादायक म्हणजे प्रसारमाध्यांची इतकी तारांबळ उडाली की, या वृत्तवाहिन्यांच्या काही प्रतिनिधींनी आपल्या सोशल मीडिया खात्यांवरुनही याबाबत खुलासे केले. (हेही वाचा, Lok Sabha Election 2024 : सातारा लोकसभेतून खासदार श्रीनिवास पाटील यांची माघार, प्रकृतीच्या कारणामुळे निवडणूक न लढवण्याचा निर्णय)
देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खुलासा
दुसऱ्या बाजुला, शिवराज पाटील चाखुरकर यांच्या स्नुशा डॉ. अर्चना पाटील चाकुरकर यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी प्रसारमाध्यमांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता अंबादास दानवे यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या निराधार असल्याचे म्हटले. दानवे आणि भाजप यांच्यामध्ये पक्षप्रवेशाबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा या क्षणापर्यंत तरी झाली नसल्याचा खुलासा केला. तसेच, प्रसारमाध्यमांनीही उगाचच एखाद्या विरोधी पक्षनेत्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात (कटघऱ्यामध्ये) उभा करुन लक्ष्य करु नये असे अवाहन केले. त्याच वेळी आम्ही जेव्हा एकादी राजकीय शस्त्रक्रिया करतो तेव्हा त्याचा प्रसारमाध्यमांना पत्ताही लागत नाही. पण, जेव्हा त्याचा पत्ता प्रसारमाध्यमांना लागलेला असतो तेव्हा अशा प्रकारची कोणताही शस्त्रक्रिया आम्ही केलेली नसते, असा टोलाही फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना लागवला.