देवेंद्र फडणवीस आणि मी एकत्र येणार, ही ब्रेकींग न्यूज; कोविड सेंटरचं उद्धाटन करताना अजित पवार यांची खोचक टिप्पणी
यावेळी अजित पवार यांनी खोचक टिप्पणी केली. 'देवेंद्र फडणवीस आणि मी दोघे एकत्र येणार म्हटलं, की लगेच ब्रेकिंग न्यूज होते,' अजित पवारांच्या या वक्तव्यावर उपस्थितांचा हशा पिकला.
आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar's) आणि माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्यात आलेल्या 200 ऑक्सिजन बेडयुक्त रुग्णालयाचे उद्धाटने झाले. यावेळी अजित पवार यांनी खोचक टिप्पणी केली. 'देवेंद्र फडणवीस आणि मी दोघे एकत्र येणार म्हटलं, की लगेच ब्रेकिंग न्यूज होते,' अजित पवारांच्या या वक्तव्यावर उपस्थितांचा हशा पिकला.
दरम्यान, यावेळी अजित पवार म्हणाले की, सध्या देशावर कोरोना विषाणूचं मोठे संकट आहे. त्यामुळे एकमेकांवर आरोपप्रत्यारोप न करता चूक लक्षात आणून देऊन काम केले पाहिजे. कोरोना विरद्धची लढाई सर्वांनी एकत्र येऊन लढली पाहिजे. प्रत्येक कोरोना रुग्णाला बेड उपलब्ध झाला पाहिजे. त्यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे. (हेही वाचा - Sushant Singh Rajput Case: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी घेतली सुशांत सिंह राजपूतचे वडील के के सिंह यांची भेट)
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने स्वतः खर्च करुन हे रुग्णालय उभं केलं आहे. याबद्दल त्याचं अभिनंदन. या रुग्णालयामुळे सर्व कोरोना रुग्णांना बेड मिळणं शक्य होणार आहे. सिरम इन्स्टिट्यूटने भारती हॉस्पिटलमध्ये कोविडवरील लशीची मानवी चाचणी सुरु केली आहे. खाजगी रुग्णालयामध्ये महापालिकेकडून लेखा परीक्षण सुरु आहे. त्यामुळे खाजगी रुग्णालयाने कोरोना रुग्णांकडून जास्त पैसे आकारू नये, अस आवाहनदेखील यावेळी अजित पवार यांनी केलं.
देवेंद्र फडणवीस आणि मी कार्यक्रमाला येणार म्हणून ब्रेकिंग न्यूज येत होती. त्यांना माहीत नव्हतं, की या कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलदेखील येणार आहेत. राजकीय भूमिका आणि मतं वेगवेगळी असू शकतात. परंतु, निवडणूक संपल्यानंतर सगळं विसरुन जावं, असं मत यावेळी अजित पवार यांनी मांडलं.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात दररोज 14 ते 15 हजार कोरोरना रुग्ण आढळून येत आहेत. पिंपरी चिंचवडचा रिकव्हरी रेट 85 टक्के आहे. त्यामुळे महापालिका आणि शासनाचे आभार. पुणे जिल्ह्यात कोरोना चाचणी वाढविण्यात आल्याने रुग्ण संख्या वाढली. त्या सर्वांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे. महापालिकेने त्यासाठी कोविड सेंटर उभारले आहे.