Detonator Found in Kalyan Railway Station: कल्याण रेल्वे स्टेशनमध्ये डिटोनेटर स्फोटके आढळळल्याने खळबळ
कल्यान स्टेशनमधील फलाट क्रमांक एकवर ही स्फोटके आढळली. प्राथमिक माहितीनुसार एका बॉक्समध्ये तब्बल 54 डिटोनेटर स्फोटके ठेवण्यात आली होती. पोलिसांना एक निनावी फोन आला. त्यांनतर पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला असता खरोखरच ही स्फोटके आढळून आली आहेत.
कल्याण रेल्वे स्टेशनमध्ये (Kalyan Railway Station) डिटोनेटर स्फोटके (Detonator Explosives) आढळल्याने खळबळ उडाली आहे. कल्यान स्टेशनमधील फलाट क्रमांक एकवर ही स्फोटके आढळली. प्राथमिक माहितीनुसार एका बॉक्समध्ये तब्बल 54 डिटोनेटर स्फोटके ठेवण्यात आली होती. पोलिसांना आज (21 फेब्रुवारी) एक निनावी फोन आला. त्यांनतर स्थानिक पोलीस आणि बॉम्बशोधक पथक घटनास्थळी पोहोचले. शोध घेतला असता असता एका बेवारस बॅगेमध्ये डिटोनेटर (स्फोटके) आढळून आली . ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सर्व स्फोटोके पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. त्यापैकी एक स्फोटक हे इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर आहे. जे खडक अथवा पर्वताला सुरुंग म्हणून वापरला जातो.
कल्याण लोहमार्ग पोलीस गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत
हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, कल्याण रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या बाहेरील बाजूस एका बेवारस बॅगमध्ये ही स्फोटके ठेवली होती. स्फोटके सापडलेला परिसर विशेष शाखा कल्याण केंद्रांतर्गत कल्याण रेल्वे पोलीस ठाणे हद्दीत येतो. बेवारस बॅग आढळून येताच परिसराची प्रथम डॉग युनिट बीडीडीएसकडून तपासणी करण्यात आली. बॅगमध्ये स्फोटकसदृश्य वस्तू आढलूनआल्याने पोलिसांनी सतर्कता बाळगत बॅग ताब्यात घेतली. दरम्यान, पोलिसांनी घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून पुढील कारवाई सुरु केली आहे. प्राप्त माहितीनुसार, कल्याण लोहमार्ग पोलीस गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया पूर्ण करत असल्याचे समजते. (हेही वाचा, गाभण गायीला चारली स्फोटके, एकास अटक)
पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात
इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि तिसुद्धा रेल्वे फलाटावर स्फोटके कोणी ठेवली. तिथे ती कशी पोहोचली याबाबत पोलीस शोध घेत आहेत. ही स्फोटके कोणी विसरले आहे की कोणी जाणीवपूर्वक ठेवली आहेत, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पलिसांनी तातडीने सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे. या संदर्भात अधिक तपशीलाची प्रतीक्षा आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक केल्याचे अथवा ताब्यात घेतल्याचे वृत्त नाही. (हेही वाचा, Kalyan: रेल्वेखाली स्वतःला झोकून देत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; आश्चर्यकारकरित्या वाचले प्राण, पहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ (Watch))
दरम्यान, अशा प्रकारची स्फोटके रायगड जिल्ह्यात डिसेंबर (2023) महिन्यातही आढळून आली होती. मानगाव पोलिसांनी कारवाई करत 1500 किलो जिवंत जिलेटीन आणि 70 किलो डिटोनेटर ताब्यात घेतले होते. ख्रिसमस आणि थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलिसांनी कायदा व सुरक्षा व्यवस्था राखण्यासाठी मोहीम राबवली होती. या वेळी केलेल्या कारवाईत हा मुद्देमाल ताब्यात गेण्यात आला. धक्कादायक म्हणजे एक टेम्पो बेकायदेशीररित्या या स्फोटकांची वाहतूक करत होता. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली होती.