Covid-19: पारनेर शहरातील सोबलेवाडी परिसरात कोरोनाबाधीत असल्याची माहिती खोटी; तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून खुलासा
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. एवढेच नव्हेतर अनेकजण एकमेकांना संशयिताने पाहू लागले आहेत. यातच पारनेर (Parner) शहरातील सोबलेवाडी (Sobalewadi) येथे गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईहून (Mumbai) परतलेल्या एका तरुणाला कोरोनाची लागण झाल्याची अफवा पसरवण्यात आली होती.
कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. एवढेच नव्हेतर अनेकजण एकमेकांना संशयिताने पाहू लागले आहेत. यातच पारनेर (Parner) शहरातील सोबलेवाडी (Sobalewadi) येथे गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईहून (Mumbai) परतलेल्या एका तरुणाला कोरोनाची लागण झाल्याची अफवा पसरवण्यात आली होती. एका जागरूक नागरिकाने त्यासंदर्भात तहसिल कार्यालयास माहिती कळवल्यानंतर तहसिलदार ज्योती देवरे, आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी शुक्रवारी रात्री सोबलेवाडीस भेट देत संबंधित व्यक्तीची तपासणी केली. त्यानंतर संबंधित व्यक्तीत कोरोनाचे कोणतेही लक्षणे आढळून आले नसून ती व्यक्ती ठणठणीत बरी आहे.
चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. कोरोना विषाणूमुळे जगभरात हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, लाखों लोकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. यामुळे सर्व नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. या भितीपोटीच काही नागरिकांनी पारनेर येथील सोबलेवाडी परिसरात एका नागरिकांसोबत धक्कादायक प्रकार घडला. नुकताच मुंबईहून परतलेल्या एका तरूणाला कोरोनाची लागण झाल्याची खोटी माहिती लोकांमध्ये पसरवण्यात आली होती. तो ज्या घरात राहत होता, त्याच्या घरामालाकाच्या आईचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला होता. यामुळे संबंधित व्यक्ती मालाकाला भेटण्यासाठी मुंबईला गेली होती, अशीही अफवा उठवली होती. मात्र, त्यानंतर त्या व्यक्तीची तपासणी करण्यात आली. मात्र, त्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आले नाहीत, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. हे देखील वाचा- Lockdown: रेशनवरील धान्याचा काळाबाजार केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल; अलिबाग येथील घटना
जगभरात कोरोनाबाधीतांची संख्या 16 लाख 91 हजार 719 वर पोहचली आहे. यांपैकी 1 लाख 2 हजार 525 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 3 लाख 68 हजार 669 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतही आता कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकत चालला असल्याची चिन्ह दिसू लागली आहे. भारतात आतापर्यंत एकूण 7 हजार 447 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 239 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 643 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 1666 वर पोहचली आहे. यात 110 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 117 रुग्ण कोरोना विषाणूच्या जाळ्यातून बाहेर आल्याचे समजत आहे.