Independence Day 2020: भारताच्या 74 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार, अनिल देशमुख, सुप्रिया सुळे यांच्यासह राजकीय नेत्यांनी दिल्या शुभेच्छा! (View Tweets)
आज 15 ऑगस्ट, भारताचा 74 वा स्वातंत्र्य दिन. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत इंग्रजांच्या जुलमी सत्तेतून स्वतंत्र झाला आणि भारताने तब्बल 150 वर्षांनंतर मुक्तपणे श्वास घेतला. आज देशभरात स्वातंत्र्य दिना उत्साहात साजरा केला जाईल.
आज 15 ऑगस्ट, भारताचा 74 वा स्वातंत्र्य दिन. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत इंग्रजांच्या जुलमी सत्तेतून स्वतंत्र झाला आणि भारताने तब्बल 150 वर्षांनंतर मुक्तपणे श्वास घेतला. आज देशभरात स्वातंत्र्य दिना उत्साहात साजरा केला जाईल. मात्र यंदा कोविड-19 च्या संकटामुळे काही बंधनं पाळावी लागणार आहेत. दरम्यान लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्या मुंबईतील वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण केले. दरम्यान 74 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar), गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh), आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope), राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ('आत्मनिर्भर भारत हा 130 कोटी भारतीयांचा मंत्र बनला आहे'; स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लाल किल्ल्यावरुन देशावासियांशी संवाद)
उपमुख्यमंत्री अजित पवार:
राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे:
गृहमंत्री अनिल देशमुख:
आरोग्यमंत्री राजेश टोपे:
दरम्यान भारताच्या स्वातंत्र्यदिनी कोरोनामुक्त महाराष्ट्राचा निर्धार करुया असं म्हणत मुख्यंमत्री कार्यालयातून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना संबोधित केले. यात त्यांनी विविध मुद्द्यांना हात घातला. कोरोना योद्धांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आत्मनिर्भार भारताचे महत्त्व, उद्देश, योजना याबद्दल बोलत त्यांनी पुन्हा एकदा स्वावलंबनाचे महत्त्व अधोरेखित केले.