डेक्कन क्विन आता धावणार ताशी 140 किलोमीटर वेगाने; 'एलएचबी' कोच सह नव्या रुपात होणार दाखल

पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी डेक्कन क्विन अर्थात दख्खनची राणी नव्या स्वरुपात दाखल होणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी डेक्कन क्विनचा चेहरामोहरा बदलून टाकण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

Representational Image (Photo Credits: PTI)

पुणे-मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी डेक्कन क्विन (Deccan Queen) अर्थात दख्खनची राणी नव्या स्वरुपात दाखल होणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी डेक्कन क्विनचा चेहरामोहरा बदलून टाकण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. डेक्कन क्विनला आता अत्याधुनिक 'एलएचबी' (LHB) कोच (लिंक हॉफमन बुश) लावण्यात येणार असून गाडीच्या डब्यांची संख्या 17 वरुन 20 करण्यात आली आहे. तसंच गाडीचा वेगही वाढणार असल्याने ही गाडी आता ताशी 140 किलोमीटर वेगाने प्रवास करु शकेल. या बदलांमुळे डेक्कन क्विनमधून अधिकाधिक प्रवासी प्रवास करु शकतील. तसंच प्रवासाचा वेळही वाचेल. डेक्कन क्विनच्या 1 जूनला असणाऱ्या वाढदिवसानिमित्त हे नवे बदल करण्यात येतील. (डेक्कन क्वीन ची डायनिंग कार प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज; लवकरच होणार दाखल)

कोचचे डिझाईन अहमदाबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन (एनआयडी) या संस्थेमार्फत मागवण्यात आले असून 15 मार्चपर्यंत ते रेल्वे प्रशासनाकडे सादर होतील. तसंच त्यांनी दिलेल्या 5 पैकी एक डिझाईन निश्चित करण्यात येईल. 'एलएचबी' कोचची निर्मिती चेन्नई येथील 'इंटिग्रल कोच फॅक्टरी'त करण्यात येते. हे कोच वजनाने हलके असतील. त्यामुळे अपघातादरम्यान जीवितहानी टळू शकेल. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्या पांढऱ्या आणि निळ्या रंगाचे असलेले कोच बदलण्यात येणार असून 'एलएचबी' कोच अधिक आकर्षक रंगसंगतीत प्रवाशांना पाहायला मिळणार आहेत.

याशिवाय नवीन बदलांनंतर डेक्कन क्विनचा ताशी 120 किलोमीटर असलेला वेग ताशी 140 किलोमीटर होणार आहे. त्यामुळे प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेत नक्कीच घट होईल. परिणामी पुणे-मुंबई हा सव्वातीन तासांत होणारा प्रवास पावणेतीन तासात होईल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now